सिंकदर शेख ‘जनसुराज्य शक्ती’चा मानकरी इराणचा पैलवान अहमद मिर्झा,कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील यांचीही बाजी

वारणेच्या आतरराष्ट्रीय कुस्ती महासंग्रामातील हजारो कुस्ती शौकीनांची उत्कंठा शिगेला पोहचलेल्या तुल्यबळ झालेल्या खडाखडी लढतीत कोल्हापूरच्या गंगावेश तालमीचा भारत केसरी पै. सिंकदर शेख याने  दिल्लीच्या विरेंद्र आखाड्याचा भारत केसरी मोनू दहिया याच्यावर दुहेरी पट काढत अवघ्या पाचच मिनिटांत निकाली डावावर विजय मिळवला.

  वारणानगर : वारणेच्या आतरराष्ट्रीय कुस्ती महासंग्रामातील हजारो कुस्ती शौकीनांची उत्कंठा शिगेला पोहचलेल्या तुल्यबळ झालेल्या खडाखडी लढतीत कोल्हापूरच्या गंगावेश तालमीचा भारत केसरी पै. सिंकदर शेख याने  दिल्लीच्या विरेंद्र आखाड्याचा भारत केसरी मोनू दहिया याच्यावर दुहेरी पट काढत अवघ्या पाचच मिनिटांत निकाली डावावर विजय मिळवला. या कुस्ती संग्रामातील प्रथम क्रमांकाचा मानाचा ‘जनसुराज्य शक्ती श्री’ किताबाचा पै. शेख हा मानकरी ठरला. पंच म्हणून राष्ट्रीय पंच संभाजी वरुटे यांनी काम पाहिले.
  पुण्याच्या काका पवार आखाड्यांचा महाराष्ट्र केसरी पै. हर्षद-सदगीर याच्यावर इराणचा आंतरराष्ट्रीय विजेता पै. अहमद मिर्झा यांच्यात अत्यंत झालेल्या चुरशीच्या लढतीत एकेरी पट काढत अहमद मिर्झा याने या कुस्ती महासंग्रामातील दुसऱ्या क्रमांकाचा ‘वारणा साखर शक्ती श्री’ किताब पटकावला. देवठाणे कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील याने उलटी डावावर अत्यंत चुरशीच्या लढतीत पंजाबचा भारत केसरी पै. लाली मांड (लुधियाना) याला चितपट करून या महा संग्रामातील तिसऱ्या क्रमांकाचा ‘वारणा दूध संघ शक्ती श्री’ किताब पटकावला. तर हनुमान आखाड्याचा उपमहाराष्ट्र केसरी पै. माऊली कोकाटे याने घुटना डावावर विजय मिळवत पंजाबचा राजस्थान केसरी पैलवान भीम याला चितपट करून चौथ्या क्रमांकाचा ‘वारणा बँक शक्ती श्री’ किताब पटकावला.

  ‘वारणा दूध साखर वाहतूक शक्ती श्री’ किताब पै. प्रकाश बानकरला
  कोल्हापूर गंगावेश तालमीचा उपमहाराष्ट्र केसरी पै.प्रकाश बानकर याने दिल्ली बंद्री आखाड्याचा पै.  अभिनायक सिंग यांच्यावर निकाली डाव टाकून विजय मिळवत पाचव्या क्रमांकाचा ‘वारणा दूध साखर वाहतूक शक्ती श्री’ किताब पटकावला. पुण्याचा राष्ट्रीय विजेता पै. दादा शेळके याने घिस्सा डाव टाकत हिमाचल केसरी पैलवान पालिंदर – मथुरा याला चितपट करत ‘वारणा ऊस वाहतूक शक्ती’ किताब पटकावला. कर्नाटकचा कर्नाटक केसरी व गेली वर्ष वारणेच्या मैदानावर सलग सात वेळा विजय मिळवणाऱ्या पै. कार्तिक काटे याने हरियानाचा आंतरराष्ट्रीय विजेता भारत केसरी पै. जितेंद्र त्रिपुडी यांच्यात झालेल्या अतंत्य चुरसीच्या लढतीत एकलांगी डावावर काटे याने त्रिपुडी याला चितपत केले.

   पै. सतपालची पै. रिजा इराणीवर एकचाकी डाव
  सांगलीचा राष्ट्रीय विजेता पै.सुबोध पाटील याने घुटणा डावावर हनुमान आखाडा दिल्लीचा राष्ट्रीय विजेता पै.  संदीप कुमार याच्यावर विजय मिळवत वारणा शिक्षण शक्ती श्री किताब पटकावला. राष्ट्रीय विजेता पै.सतपाल सोनटक्के (टेंभुर्णी) विरुद्ध इराणचा आतंरराष्ट्रीय विजेता पै. रिजा इराणी यांच्यामध्ये झालेल्या लढतीत पै. सतपालने एकचाकी डावावर चितपट करत ‘वारणा बझार – वारणा महिला शक्ती श्री’ किताब पटकावला.