जिल्हयात २६ सरपंच पदासाठी तर १३२ सदस्य पदासाठी ३६४ उमेदवाराचे भवितव्य सिलबंद!

जिल्ह्यातील २६ सरपंच पदासाठी ७८ तर १३२ सदस्य पदासाठी ३६४ उमेदवाराचे भवितव्य सिलबंद झाले आहे.

    सिंधुदुर्ग : सार्वत्रिक २४ ग्रामपंचायत सरपंच पदासाठी ६६ उमेदवार तर ७६ सदस्य पदासाठी ३२४ उमेदवारांचे भवितव्य पोटनिवडणुकीत सरपंच पदाच्या ५ जागांपैकी २ जागांसाठी निवडणूक होत असून ५६ सदस्य संख्येत फक्त २२ उमेदवाराचे भवितव्य दिनांक ५ नोव्हेंबर रोजी इव्हीएम पद्धतीने सायंकाळी साडेपाच वाजता सिलबंद झाले आहे. आज शांततापूर्ण वातावरणात ७० टक्के मतदान झाले, त्यासाठी ३९० पोलीस ७८ मिळून ५०९ निवडणूक कर्मचारी पोहोचले, ७८ मतदान केंद्रावर सकाळपासून मतदान सुरु झाले आहे. जिल्ह्यातील २६ सरपंच पदासाठी ७८ तर १३२ सदस्य पदासाठी ३६४ उमेदवाराचे भवितव्य सिलबंद झाले आहे.

    राज्य निवडणूक आयोगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायतींच्या सर्वत्र निवडणुका जाहीर केल्या होत्या, त्यात ६ तालुक्यात ७६ सदस्यांसाठी ४१७ तर २४ सरपंच पदासाठी १०३ अर्ज दाखल झाले होते. या छाननीमध्ये देवगड तालुक्यातील सरपंच पदासाठी १ आणि सदस्य पदासाठी २ असे ३ अर्ज बाद ठरले होते. अर्जमागे घेण्याच्या कालच्या अंतिम दिवशी सरपंच पदासाठी १०३ अर्जापैकी ३६ अर्ज मागे घेतले असून ४१७ सदस्य पद अर्जापैकी ७३ अर्ज मागे घेतले होते. प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका होणाऱ्या सार्वत्रिक २४ ग्रामपंचायती पैकी सरपंच पदाचे ६६ उमेदवार आहेत. त्यात देवगड तालुक्यातील ९ सरपंच पदासाठी १९ तर २८ सदस्य पदासाठी १०९, मालवण तालुक्यात १ सरपंच पदासाठी ३ अर्ज, तर ५ सदस्य पदासाठी २९ अर्ज, कणकवली तालुक्यात २ सरपंच पदासाठी ५ तर ६ सदस्य पदासाठी १९ अर्ज, कुडाळ तालुक्यात ५ सरपंच पदासाठी १९ अर्ज तर १५ सदस्य पदासाठी ७-८ अर्ज, वेंगुर्ले तालुक्यात ४ सरपंच पदासाठी १३ तर १२ सदस्य पदासाठी ७३ अर्ज, दोडामार्ग तालुक्यात ३ सरपंच पदासाठी ७ तर १० सदस्य पदासाठी ३४ अर्ज रिंगणात आहेत. त्यामुळे या सार्वत्रिक निवडणुकीत २४ सरपंच पदासाठी ६६ उमेदवार रिंगणात आहेत तर ७६ सदस्य पदासाठी ३४२ उमेदवार रिंगणात आहेत. या अटीतटीशी दुरंगी आणि तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

    प्रत्येक उमेदवाराला चिन्ह देण्यात आल्याने प्रचाराला चांगलीच रंगत आली होती आचरा, हुमरमळा सारख्या अन्य काही ग्रामपंचायतीमध्ये चुरशीच्या लढत सुरु आहेत. आचरा गावामध्ये सरपंच पदासाठी आणि सदस्य पदासाठी अटीतटी चुरशीची लढत आहे. शिवसेना आणि भाजपाने सदरची निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे आज सकाळी १० नतर स्पष्ट होईल, तर कुडाळ तालुक्यातील अणाव हुमरमाळागावात लिंबू आणि टाचणी लावून देवबाधित कृत्य केल्याचा प्रकार चर्चिला जात आहे. सरपंच पदासाठी पाच उमेदवार रिंगणात असून सदस्य पदासाठी ही अटीतटीची लढत आहे. यात कोण बाजी मारणार हे गावाच्या विकासासाठी सर्वांची इच्छा असल्यामुळे हे उमेदवार रिंगणात असून या लिंबू टिंबच्या प्रकारामुळे मतदार घाबरून न जाता परखडमध्ये मतदान करून यापूर्वीची ही पद्धत मोडीस काढतील आणि गावाच्या विकासासाठी बंद मतपेटीतून साथ देतील असे उमेदवारांनी सांगितले.