संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करु नये, मुंबई मनपा निवडणूक ऊबाठा सेनेच्या न्यायलायातील याचिकांमुळे अडकली – आ.नितेश राणे

शिवसेना आमदार शिरसाठ यांनी तुम्ही मुख्यमंत्री शिंदे यांना किती त्रास देता हे पहा, फडणवीस यांनी काय काम करावे? कुठे करावे? हे सांगण्याइतके तुम्ही मोठे नाही.

    कणकवली : शरद पवार आपलेच नाव चालवणार म्हणून संजय राऊत आमदारांना फोन करायला लागला. पण त्यांच्या लायकी प्रमाणे २ ते ३ पेक्षा जास्त आमदार बैठकीला जमलेच नाहीत, ही संजय राऊतची लायकी आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुमची लायकी ओळखली म्हणूनच संजय राजाराम राऊत यांच्या भावाला सुनील राऊत याला राज्यमंत्री केलं नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल बोलण्याआधी संजय राजाराम राऊतने स्वतःची लायकी पाहावी, मुंबई मनपा निवडणूक ऊबाठा सेनेच्या न्यायलायातील याचिकांमुळे अडकली असल्याची टीका भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी केली.

    शिवसेना आमदार शिरसाठ यांनी तुम्ही मुख्यमंत्री शिंदे यांना किती त्रास देता हे पहा, फडणवीस यांनी काय काम करावे? कुठे करावे? हे सांगण्याइतके तुम्ही मोठे नाही. तुमच्या बोलण्याचा राऊत, ठाकरे यांना फायदा होईल असे वागू नका असा सल्ला मित्र पक्षाच्या आमदारांना आ.नितेश राणे यांनी दिला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उबाठा सेनेमुळे लांबत आहे, उबाठा सेनेने न्यायालयात टाकलेल्या याचिका मागे घ्या, मग निवडणूक आयोग निवडणुका घेईल. उबाठा पक्षाला स्वतःचे चिन्ह नाही पक्ष नाही मग काय करणार? त्यांना इंडिया आघाडी शिवाय पर्याय नाही. बाळासाहेब तुझे सुद्धा विठ्ठल होते ना. मग त्यांचे घर का फोडले. तेच राष्ट्रवादी पक्ष अध्यक्ष शरद पवार तुमचे होते, मग त्यांच्या घरात फूट का पाडली. संजय राऊत आग लावून शकुनी मामा सारखी भूमिका करत असल्याचा आरोप आ.नितेश राणे यांनी केला.