
कर्नाटकच्या वाट्याला वीस गाड्या आलेल्या आहेत आणि कोणतेही पैसे खर्च न करता केरळ तामिळनाडूच्या वाट्याला दहा दहा गाड्या दिलेल्या आहेत.
सिंधुदुर्ग : १३ कोकण रेल्वेचा आर्थिक वाटा उचलला तेवढ्या प्रमाणात मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या गाड्या पण उचला आज कोकणात मोठ्या प्रमाणात रिझर्वेशन मिळत नाही अनेक बाहेरून येणाऱ्या गाण्यांना थांबे नाहीत यातून कोकणाचा आणि महाराष्ट्राचा आर्थिक विकास साधा अशी मागणी कोकणरेल्वे संस्थापक सदस्य सुरेंद्र नेमळेकर यांनी केली आहे.
यावेळी नेमळेकर यांनी केलेल्या मागणीत कोकण रेल्वेची उभारणी करताना महाराष्ट्राने ७० टक्के वाटा उचललेला आहे. गोव्याने १० टक्के आणि २० टक्के कर्नाटक ने उचलला. महाराष्ट्राच्या वाट्याला फक्त दोनच गाड्या आल्या आहेत .त्यापैकी एक दादर रत्नागिरी ती पण संपूर्ण महाराष्ट्रात धावत नाही व दुसरी नारायणराव राणे यांनी सुरू केलेली तुतारी एक्सप्रेस. गोव्याच्या वाट्याला दहा गाड्या आल्या आहेत. कर्नाटकच्या वाट्याला वीस गाड्या आलेल्या आहेत आणि कोणतेही पैसे खर्च न करता केरळ तामिळनाडूच्या वाट्याला दहा दहा गाड्या दिलेल्या आहेत. मग ७० टक्के वाटा उचलून आर्थिक भार सोसून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यांच्या वाट्याला गाड्या का आल्या नाहीत?
जिल्हा मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्ग स्टेशनवर जलद गाड्याना थांबा नाही, आज वेळ आलेली आहे महाराष्ट्राच्या वाट्याला किमान अजून तीन गाड्या आल्या पाहिजेत एक वसई सावंतवाडी दुसरी पनवेल रत्नागिरी मडगांव सकाळी सात वाजता व रात्री सावंतवाडी वरून दिव्याला परत जाणारी गाडी पुन्हा दिवा सावंतवाडी म्हणून सोडण्यात यावी.
तसेच १९७७ भूसंपादन केलेल्या रायगड जिल्ह्यातील रोहा ते पनवेल परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिलेल्या आहेत विजेची जोडणी पूर्ण झालेली आहे मग पनवेल वरून दर एक तासाला रोहा लोकल सुरू झाली तर कोकणातील शेतकरी विशेषता रायगड मधील पनवेल मुंबईमध्ये येऊ नोकरी करू शकतो आणि आज करत आहेत. त्याप्रमाणे सिंधुदुर्गमधून गोव्यात जाणारे अनेक जण नोकरी करत आहेत. मडगाव ते सिंधुदुर्ग वैभववाडी लोकल वायलाहवी आज त्यांना एसटीने प्रवास करावा लागत आहे? त्यात विलंब होतो तसेच पनवेल वरून रोहा लोकल सुरू करण्यात यावी अशी मागणी सुरेंद्र नेमळेकर संस्थापक सदस्य कोकण रेल्वे यांनी केली आहे.