
२२१ व्यक्ती बेपत्ता असून त्याबाबत काही माहिती मिळाल्यास जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑगस्ट महिना अखेर तब्बल २३१ व्यक्ती बेपत्ता असल्याची माहिती पोलीस रेकॉर्ड वरून उपलब्ध झाली आहे. त्यानुसार पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली १७ ते २७ सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेत ४० बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यात पोलीस दलाला यश आले आहे. उर्वरित आणखी २२१ व्यक्ती बेपत्ता असून त्याबाबत काही माहिती मिळाल्यास जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या रेकॉर्डवर ऑगस्ट २०२३ अखेरपर्यंत २६१ व्यक्ती बेपत्ता असल्याची नोंद आहे. त्यामध्ये दोडामार्ग २२, बांदा ४, सावंतवाडी ३९, वेंगुर्ले १६, निवती ७, कुडाळ ३७, सिंधुदुर्ग ५, मालवण २२, आचरा ९, कणकवली ६४, देवगड १९, विजयदुर्ग २०, वैभववाडी ७ अशा एकूण २६१ बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी १७ ते २७ सप्टेंबर या कालावधीत विशेष मोहीम देण्याची सूचना पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली होती.
या मोहिमेच्या कालावधीत चाळीस बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यात यश आले आहे. ४० पैकी चार बेपत्ता व्यक्तींचा शोध विशेष बदकामार ३६ व्यक्तींचा सर्व पोलीस ठाण्यांतर्गत घेण्यात यश आले आहे. या शोध मोहीम मध्ये बांदा पोलीस ठाण्यात २, सावंतवाडी ४, वेंगुर्ले १२, कुडाळ ३, मालवण ८, आचरा ५, कणकवली ६, अशा ४० जणांचा समावेश आहे. अन्य बेपत्ताचा व्यक्तींचा शोध घेण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस नियंत्रण कक्षाकडून केले आहे.