महाराष्ट्राचे सूर्याजी पिसाळ असलेल्या राऊत, ठाकरे यांनी नैतिकतेचे धडे शिकवू नयेत, भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांची सडकून टीका

विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेनी नागपूर पाहून यावे आणि मातोश्रीवर आपल्या मालकाला भेटून नागपूरमध्ये केलेला विकास मुंबईत का नाही केला याचा जाब विचारावा.

    सिंधुदुर्ग : नैतिकता, शपथ असे शब्द राऊत, ठाकरे यांच्या सारख्या बरबटलेल्या लोकांच्या तोंडात शोभत नाहीत. घटनेचा खून कोणी केला? उद्धव ठाकरे आमदारकीचा राजीनामा देणार होते तो अद्याप दिला नाही. शिवसैनिक म्हणून कोणती नैतिकता पाळली? नीतिमत्तेचे धडे आम्हाला देऊ नका. ती नीतिमत्ता तुमच्यात असेल तर तुम्ही घरात नवरा म्हणून सुद्धा राहण्याच्या लायकीचे नाहीत. तुमची नीतिमत्ता म्हणजे दाऊद इब्राहिमने मुंबईत येऊन आम्हाला धडे देण्यासारखे आहे अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली.

    माझ्या पत्रानंतर संजय राऊत यांनी अध्यक्ष श्री. नार्वेकर यांच्यावरील टीका थोडी कमी झाली आहे. मात्र त्यांची खासदारकी या पुढे राहणार नाही. लोकशाहीचा खून आणि मोठे मोठे शब्द बोलून संजय राऊत न्यायाधीश असलेल्या विधानसभा अध्यक्ष आणि प्रक्रियेवर दबाव आणत आहेत. म्हणून अध्यक्ष न्यायाधीशाच्या भूमिकेत आहेत. त्यांच्यावर टीका करणे हा हककभंग आहे. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेनी नागपूर पाहून यावे आणि मातोश्रीवर आपल्या मालकाला भेटून नागपूरमध्ये केलेला विकास मुंबईत का नाही केला याचा जाब विचारावा.

    दानवे हे हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता राहणार नाही. अनिल परब मातोश्रीच्या तिसऱ्या माळावर जाऊन रडत आहेत. त्यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद हवे आहेत आणि त्यामुळे ते मातोश्रीवर दबाव आणत आहेत. दानवे यांचा कार्यकाल लवकरच संपेल असे भाकीत आमदार नितेश राणे यांनी केले. त्यामुळे दानवेंना कार्टून पाहायचे असल्यास ते मालकाच्या मुलाकडे पाहावे असा सल्ला दिला. एनडीएमध्ये मुख्यमंत्री शिंदे साहेबांची शिवसेना आहे. तुम्ही इंडिया अलायन्सचे काय झाले ते सांगा. साधे चिन्ह तरी ठरवू शकले काय? हरियाणाच्या इंडिया आघाडीचा कार्यक्रम सोडून नितीश कुमार पंडित दीन दयाळ उपाध्याय यांच्या अभिवादन कार्यक्रमाला गेले होते. यातून इंडिया आघाडीची काय अवस्था झाली आहे हे कळते. त्यामुळे आमच्या कडे पाहण्यापेक्षा स्वतःचे घर सांभाळ असा सल्ला आमदार राणे यांनी खासदार संजय राऊत यांना दिला.