
अचानक कंत्राटी भरतीच्या या न्याय प्रश्न लक्षवेधी करत जिल्ह्यात भाजपा पदाधिकाऱ्यांनी निषेध आंदोलन केले व आघाडी सरकारमधील शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणा दिल्या.
सिंधुदुर्ग : महाविकास आघाडी सरकारच्या काळात कंत्राटी भरतीचे केलेले पाप धुऊन काढण्यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ही भरती प्रक्रिया माथी मारून “खोटे बोला पण रेटून बोला ” हा महाविकास आघाडी मधील नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांचा हा प्रयत्न निषेधार्य आहे, या निषेधार्थ, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राज्य भाजपा उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या नेतृत्वाखाली कंत्राटी भरती प्रक्रियेचा निर्णय घेणाऱ्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या निषेधाच्या घोषणा देत निषेध नोंदविला व एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आरोप आम्ही खपवून घेणार नाही असा इशाराही भाजपा उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिला आहे.
महाविकास आघाडी सरकार काळात काळात कंत्राटी भरतीचा निर्णय घेऊन एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हा निर्णय घेतला असे ठासून सांगणाऱ्या महाविकास आघाडी सरकारसह शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या विरोधात भाजपा पदाधिकाऱ्यांनी घोषणा दिल्या. यावेळी माजी जि.प. उपाध्यक्ष रणजीत देसाई, जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरेगावकर, माजी सदस्या सुप्रिया वालावलकर, बंड्या सावंत, महेश धुरी, सुधीर नकाशे, रवी तिरलोटकर, महेश मांजरेकर आदींसह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अचानक कंत्राटी भरतीच्या या न्याय प्रश्न लक्षवेधी करत जिल्ह्यात भाजपा पदाधिकाऱ्यांनी निषेध आंदोलन केले व आघाडी सरकारमधील शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणा दिल्या. कंत्राटी कर्मचारी भरतीचा निर्णय घेणाऱ्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा निषेध यावेळी करत भाजपा राज्य उपाध्यक्ष अतुल काशीकर यांनी कंत्राटी भरती ही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या काळात करण्यात आली. त्यावेळीच्या मुख्यमंत्र्यांनी ही भरती सुरू केली होती. मात्र उलट चर्चा करत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या महायुती सरकारवर कंत्राटी भरतीचे पाप लागण्याचं काम तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचे शरद पवार, उद्धव ठाकरे करत आहेत. त्यामुळे भाजपाने त्याचा निषेध केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर कंत्राटी भरती प्रक्रिया रद्द केली असून शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी या महायुतीच्या महायुतीला दोष देणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचे पडदा फाश देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे, भाजपा कंत्राटी भरती करण्याच्या विरोधात आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यावेळी दोन एजंटांमार्फत भरती करण्यात आली व भरमसाठ पैसे घेऊन ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या या सरकारमध्ये ही प्रक्रिया सुलभ करताना कंत्राटी भरती करणे यामुळे कर्मचाऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे ही भरती प्रक्रिया रद्द करून ७० हजार नोकर भरतीची देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती. ती भरती आता महायुती शासन करत आहे, हे शासनाच्या निर्णया विरोधात महाविकास आघाडी सरकारच्या काळात केलेल्या कंत्राटी भरतीचे चुकीचे काम एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस महायुती सरकारच्या माथी मारण्याचा ‘खोटे बोला पण रेटून बोला ” हा हट्टाहास मोडून काढण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाना पटोले यांचा निषेध केला आणि यापुढे देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आरोप केल्यास भाजपा गप्प बसणार नाही असा इशाराही भाजपा राज्य उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिला आहे.