सिंधुदुर्ग जिल्हयात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषण आंदोलन, जनतेच्या प्रश्नापेक्षा राजकारण्यांनी राजकारणासाठी चालविलेले राज्य – वैभव नाईक

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रश्नासाठी गेले अनेक दिवस जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आम्ही ठाम आहोत.

  सिंधुदुर्ग : आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, राजकारण्यांनी राजकारणासाठी राज्य चालविण्याचे काम सुरू आहे, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत शासनाचे आरक्षण प्रश्नी वेळ काढू धोरण अवलंबले आहे. ९६ कुळी किंवा कुणबी असा बुद्धिभेद न करता आरक्षणाचा प्रश्न सोडवावा आम्ही तालुका तालुक्यात गावा गावातून आंदोलन उपोषणे करू असा इशारा दिला आहे. तर आमदार वैभव नाईक यांनी जरांगे पाटील यांच्या भूमिकेला विरोध करणाऱ्यांचा आम्ही जाहीर निषेध नोंदवत मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे असा पवित्रा नोंदविला तर सतीश सावंत यांनी मराठा समाजातून राजकारण करणाऱ्या नेत्याची भूमीका समाजासमोर आणली आहे, आता शहान्नव कुळी आणि कुणबी असा बुद्धिभेद न करता मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करावे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

  सिंधुदुर्ग येथे सिंधुदुर्ग जिल्हा मराठा समाजाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अड. सुहास सावंत यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करते जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजाच्या वतीने एक दिवसीय लक्षणीय उपोषण केले यावेळी आमदार वैभव नाईक, सतीश सावंत, चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, सुशांत नाईक, पुंडलिक दळवी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामत, सुंदर सावंत भोसले, रूपाली पाटील, रवींद्र परब, प्रकाश देसाई, मधुरा राऊळ, काका कुडाळकर, राजेंद्र सावंत, धीरज परब, संतोष राणे, सुबोध परब, शंकर परब, मोहन पाताडे, संजय सावंत, संग्राम सावंत, मनोहर येरम, स्वप्निल परब, किरण चव्हाण आदींसह जिल्हाभरातून मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. “एक मराठा लाख मराठा अशा विविध घोषणा देत जरांगे पाटील यांच्या पाठीशी आम्ही ठाम राहणार मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. जरंगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है, जय जय जय जय जय जय जय भवानी जय जय जय जय जय शिवाजी अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडून राजकारण्यांनी राजकारणासाठी चालविलेले हे सरकार आरक्षण देऊ शकत नाही असा टोलाही लगावला.

  यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीर पाठिंबा दिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० दिवसात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द जरांगे पाटील यांना दिला होता. या आश्वासनावर विश्वास ठेवून जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले होते ते अभिवचन मुख्यमंत्र्यांनी पाळले नाही त्यामुळे जरांगे पाटील यांना पुन्हा उपोषण घ्यावे लागत आहे. मुख्यमंत्र्यांनी खरी कबुली दिली परंतु आता टोल वा टोलवी का देवेंद्र फडणवीस हेच मराठा समाज आरक्षणाचा खरा अडथळा आहेत. मराठा समाज आरक्षण विरोधात सुप्रीम कोर्टात गुनरत्न सदावर्ते वकीलपत्र कोणाच्या आदेशाने घेऊन गेले सदावर्ते त्यांचा मास्टरमाईंड कोण हे संपूर्ण महाराष्ट्राला अवगत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मराठा द्वेष भूमिकेचा आम्ही निषेध करून मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी आंदोलन सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे. आम्ही मराठा समाजाच्या पाठीशी प्रामाणिकपणे राहू असेही आश्वासन जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिले.

  यावेळी बोलताना मराठा समाज संघटनेचे अध्यक्ष सतीश सावंत म्हणाले जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबासाठी आज आपण हे लक्षणीय उपोषण केले आहे. जरांगे पाटील यांची भूमिका रास्त आहे शासनाने याचा विचार करून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे एका निवृत्त सरन्यायाधीश बाटिया यांच्या कमिटीने ओबीसी ३२ टक्के आरक्षण दिले जाते ते साडेआठ टक्के असल्याचा निष्कर्ष काढला आहे. या ३२ टक्के मधून जरी आरक्षण दिले तरी मराठा समाजाला ५०% मधूनच आरक्षण मर्यादा शासन आरक्षण देऊ शकते आणि न्यायालयाचे ते टिकू शकेल असे सांगत राज्य सरकारने मराठा समाजाच्या कायदेशीर बाबी तपासून मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास आम्ही तालुका तालुक्यात गावागावात आंदोलने उपोषने करू न पेक्षा जिल्हास्तरावर एक आक्रमक आंदोलन केले जाईल याची जबाबदारी प्रशासनावर राहील असेही स्पष्ट केले.

  मराठा समाजाच्या या आरक्षण प्रश्नावर गेल्या एक महिन्यापूर्वी जरांगे पाटील यांनी कुणबी आरक्षण मिळावे यासाठी उपोषण केले गेले. आठ दिवस जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे परंतु अजूनही सरकार आरक्षण देण्यास आग्रही नाही. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे विशेष अधिवेशन बोलावणे आवश्यक आहे हे सरकारला माहीत आहे. या सरकारमधील एक उपमुख्यमंत्री आजारी तर दुसरे दिल्लीत जाऊन बसले आहेत. सरकार आरक्षण देण्यात आग्रही नसल्याचे सांगत मराठा समाजाच्या या भूमिकेबाबत जरांगे पाटील यांचे आरक्षण मोडून काढण्याचे काही नेतेमंडळी आग्रही आहेत. त्याचा आम्ही निषेध करतो यामुळे समाजाच्या भावना ही दुखावल्या आहेत सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे त्यापेक्षा आम्ही समाज संघटनेच्या पाठीशी राहून तीव्र लढा ऊभारू असा इशाराच आमदार वैभव नाईक यांनी दिला.

  जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषण सुरू आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलने उपोषणे जाळपोळ सुरू आहेत. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा मराठा समाज संघटनेच्या वतीने आज लक्षणीय उपोषण केले आहे. जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळावे हा विषय लावून धरला आहे. हे आपण विसरता कामा नये मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार वेळ काढून धोरण अवलंबत आहे. त्याचा त्रास जरांगे पाटील यांना होत असून कुणबी आरक्षण मिळू शकते. मराठा समाजातून काही नेते झाले ९६ कुळी आणि कुणबी असा बुद्धिभेद न करता टिकेल असेच आरक्षण मिळाले पाहिजे कुंणबी मराठा अशी जात सगळीकडे कायदेशीर रित्या मिळते त्यामुळे कुणबी मराठा बुद्धिभेद न करता मराठा समाजाला आरक्षण मिळेल यासाठी आग्रही राहू.

  मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रश्नासाठी गेले अनेक दिवस जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आम्ही ठाम आहोत. परंतु यासाठी तरुण पिढीने अशा उपोषण आंदोलन मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले पाहिजे यापुढे तरुण पिढीला या आरक्षणाचा खऱ्या अर्थाने फायदा आहे. याचे भान ठेवून आपल्याला या न्याय मागणीसाठी सक्रिय व्हा असे आवाहन सुशांत नाईक यांनी केले.

  मराठा समाजाला आरक्षण मिळावे या भूमिकेसाठी राज्यभर आंदोलन मोर्चा जाळपोळ सुरू आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची भूमिका रास्त आहे त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर आपले रक्त आटवले त्यांना साथ देण्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा बांधवांनी एक दिवसीय लक्षणीय उपोषण केले आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने उपोषणे होत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे शासनाने हे आरक्षण दिलेच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. शासन यासाठी आग्रही नाही या धगधगत्या विस्तवात शासनाने उपवाळू नये या रास्त मागण्याची दखल घ्यावी. ओबीसी संघटनेचाही पाठिंबा – काका कुडाळ कर मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी आम्हीही आग्रही आहोत आपला मराठा समाजाला आरक्षणासाठी पूर्ण पाठिंबा आहे. शिक्षण नोकरी यामध्ये तरुण पिढीला न्याय मिळावा यासाठी आरक्षण महत्त्वाचे आहे. ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी आमच्या समाजानेही यापूर्वी आंदोलन मोर्चा उपोषण केले. आज गोरगरिबांसाठी आरक्षण महत्त्वाचे आहे. आपला मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळण्यासाठी पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी सुंदर सावंत यांनी मराठा समाजाला शासनाने आरक्षण द्यावे. शांततेच्या मार्गाने आरक्षण देणे शक्य होते परंतु सरकारने यामध्ये योग्य ती दखल न घेता जरांगे पाटील यांचे उपोषण मोडून काढण्याचा काहीसा प्रयत्न केला. आम्हाला आरक्षण मिळावे यासाठी आम्ही ठाम आहोत. जर शासनाने दखल न घेतल्यास आम्ही यापुढे तीव्र आंदोलने उभारू ९६ कुळी मराठा किंवा कुणबी असा भेदभाव न करता मराठा आरक्षण या मुद्द्यावर शासनाने ठोस भूमिका बजवावी.