अपघातग्रस्त रुग्णांसह रुग्णांची मेडीकल कॉलेज रुग्णालयात होतेय दुरावस्था

सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण सिंधुदुर्ग येथे अस्तित्वात असलेल्या जिल्हा रुग्णालयात केंद्र शासनाच्या माध्यमातून मेडिकल कॉलेज मंजूर झाले.

    सिंधुदुर्ग : ९ जिल्हा रुग्णालयात अनेक वर्षे आरोग्य सुविधांचा पाढा वाचून सोयी सुविधांसाठी मेडिकल कॉलेज झाले. परंतु जिल्हा मेडिकल कॉलेजमध्ये अनेक तज्ञ डॉक्टर अपघात ग्रस्त फ्रॅक्चर व अन्य तज्ञांची वनवा जाणवत आहे. गेले आठ ते पंधरा दिवस अनेक अपघात ग्रस्त रुग्ण कितपत पडले असून मेडिकल कॉलेज मधील दुरावस्थेमुळे रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत. या प्रश्नांकडे केद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण खासदार विनायक राऊत जिल्हाधिकारी किशोर तावडे भान प्रत्यक्षदर्शी आढावा घेतला. दुरावस्थेची पाहणी झाली परंतु रुग्णांच्या गैरसोयी सुविधा आणि मनमानीकडे कधी लक्ष देणार असा सवाल आता जनसामान्यातून उपस्थित होऊ लागला आहे.

    सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण सिंधुदुर्ग येथे अस्तित्वात असलेल्या जिल्हा रुग्णालयात केंद्र शासनाच्या माध्यमातून मेडिकल कॉलेज मंजूर झाले. या मेडिकल कॉलेजमधून जिल्ह्यात रुग्णांची गैरसोय होणाऱ्या डॉक्टरांची वनवा दूर होईल अशी सर्वसामान्य जनतेची धारणा होती. एकीकडे राज्य शासनाने गोरगरीब जनतेसाठी मोफत आरोग्य सुविधा निर्माण केल्या आणि दुसरीकडे मेडिकल कॉलेजच्या तज्ञ डॉक्टर आणि अपघातग्रस्त तज्ञांचा तसेच अन्य सोयीसुविधांचा औषध पाठपुरवठ्याचा वनवा जाणवत आहे. यासंदर्भात गेले अनेक महिने आणि वर्ष जिल्हा रुग्णालयाच्या गैरसोयी बाबत वृत्तपत्र आणि दूरचित्रवाहिनीच्या माध्यमातून आवाज उठविले गेले. केद्रीयमंत्री नारायण राणे, जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही नुकतीच एक बैठक घेऊन येथील सोयीसुविधा मेडिकल कॉलेज आणि जिल्हा रुग्णालय यांच्या समस्या जाणून घेतल्या. मेडिकल कॉलेज झाले तरी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग नगरीतच असायला हवे असे सर्वसामान्यांचे मत असून नव्याने होऊ घातलेल्या या मेडिकल कॉलेजमध्ये जिल्हा रुग्णालयाचे हस्तांतरण करण्यात आले आहे. मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांची असलेली गैरसोय तज्ञांचा वनवा अपघातग्रस्त पेशंट गेली अनेक दिवस आणि महिने ऑपरेशन अभावी कितपत पडले असून या ऑपरेशन करण्यासाठी येणारे संबंधित डॉक्टर मंगळवार किंवा शुक्रवार या दोनच दिवसात येत असतात.

    या कालावधीत दोन किंवा तीन रुग्णांचीच तपासणी करून ऑपरेशन केले जाते. परंतु गेले अनेक दिवस कितपत पडलेले या रुग्णांना रुग्णसेवेपासून गैरसोय होताना दिसत आहे. राज्य शासन जनतेच्या आरोग्यासाठी मोफत आरोग्य सुविधा देण्याचे अभिवचन दिले. परंतु अजूनही अपघातग्रस्त तज्ञ डॉक्टर आणि औषध पुरवठ्याचा मोठ्या प्रमाणात गैर होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळात हे वैद्यकीय मेडिकल कॉलेज कार्यान्वित झाले आणि आता शिंदे सेना भाजपाचे असलेल्या सरकार मधून या जिल्हा रुग्णालयाच्या प्रश्नाबाबत आणि मेडिकल कॉलेज मधील गैरसोयी बाबत लोकप्रतिनिधी कधी लक्ष देणार आलेल्या रुग्णांना फक्त हलवण्याचे काम केले जाते. काही रुग्णांची आर्थिक दृष्ट्या होणारी गैरसोय यामुळे अनेक रुग्ण रुग्णालयातच गेले पंधरा-वीस दिवस एकाच ठिकाणी पडून आहेत. संबंधित अपघातग्रस्त तज्ञ डॉक्टर उपलब्ध होऊ शकत नाही याकडे कोण लक्ष देणार सर्वसामान्यांच्या विकासासाठी असलेले हे सरकार आरोग्य सोयी सुविधांकडे आता तरी लक्ष देईल का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.