चिपी विमानतळावरून इंडिगो आकासा हवाई वाहतूक सुरु करा खा. विनायक राऊत यांची मागणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी येथे विमानतळावर येणारे अलायन्स हेअर कंपनीची विमाने वेळेवर येत नाहीत अनेक वेळा प्रवाशांना विमानसेवा रद्द झाल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.

    सिंधुदुर्ग : मुंबई ते चीपी (सिंधुदुर्ग) या हवाई मार्गावर सुरू केलेले अलायन्स एयर ही हवाई वाहतूक कंपनी रद्द करावी, तसेच अपयशी ठरलेल्या आय.आर.बी. या चीपी एअरपोर्टच्या ऑपरेटरला रद्द करा आणि इंडिगो, अकासा सारख्या हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना सिंधुदुर्ग मध्ये हवाई वाहतूक करण्याची परवानगी द्यावी, ही मागणी शुक्रवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२३ रोजी नागरी विमान मंत्रालयाचे मंत्री मा.ना.श्री.ज्योतिरादित्य शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीमध्ये खासदार श्री.विनायक राऊत यांनी केली. त्याचबरोबर लेखी पत्रही मंत्री महोदय यांना दिले होते. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व इतर सर्व संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करून सिंधुदुर्गच्या हितासाठी योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्वासन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिले.

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी येथे विमानतळावर येणारे अलायन्स हेअर कंपनीची विमाने वेळेवर येत नाहीत अनेक वेळा प्रवाशांना विमानसेवा रद्द झाल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून या पर्यटन जिल्ह्यात देशी विदेशी पर्यटक यावे या दृष्टीने चिपी येथे विमानतळ साकारण्यात आला आहे. सध्या अलायन्स एअर कंपनीचे विमान येताच काही वेळा ती रद्द ही होतात त्यामुळे सातत्य राहत नाही प्रवाशांची वाढती तक्रार लक्षात घेऊन या प्रश्नाकडे ज्योतीरादित्य शिंदे यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी कंपन्यांची विमाने उड्डाणे वाढवावी अशी यापूर्वी मागणी केल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सुचित केले.

    दरम्यान या सातत्यपूर्ण मागणीबाबत दिल्ली येथे खास बैठक घेऊन नागरी विमान मंत्रालयाचे मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी बैठक घेऊन या बैठकीत झालेल्या चर्चेबाबत लवकरच योग्य तो तोडगा काढण्यात येईल तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करून इंडिगो, आकाशा यासारख्या कंपनीची विमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात चि पी विमानतळावर उतरवण्याबाबत विचार केला जाईल असे सूचक वक्तव्य मंत्री महोदयांनी केल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.