डामरे गावात एसटी वेळेवर न सोडल्यास रास्ता आंदोलन छेडण्याचा इशारा, डामरे ग्रामस्थांनी आगार व्यवस्थापकांना दिले निवेदन

लवकरात लवकर तोडगा काढू असे आश्वासन श्री. यादव यांनी ग्रामस्थांना दिले. याबाबतचे निवेदन डामरे ग्रामस्थांनी बुधवारी आगार व्यवस्थापकांना दिले आहे.

    सिंधुदुर्ग : डामरे गावात येणारे बस वेळेवर येत नसल्याने मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी वेळेवर बस न सोडल्यास रास्ता रोको, धरणे आंदोलनाचा इशारा पालक व डामरे ग्रामस्थांनी कणकवली आगार व्यवस्थापक प्रमोद यादव यांना दिला आहे. यावर लवकरात लवकर तोडगा काढू असे आश्वासन श्री. यादव यांनी ग्रामस्थांना दिले.
    याबाबतचे निवेदन डामरे ग्रामस्थांनी बुधवारी आगार व्यवस्थापकांना दिले आहे. यावेळी दिगंबर जाधव, शैलेश कानडे, संदीप साटम, सुभाष जाधव, उत्तम जाधव, सिद्धराज दळवी, प्रसाद सावंत, मंगेश सावंत, रुपेश पारकर, स्नेहलता सावंत, पंकज साटम, प्रिया नांचे, विकास गुरव, संगीता गुरव, सत्यवान परब, सत्यवान सावंत आदी उपस्थित होते.
    डामरे ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कणकवली – करुळ व्हाया जाणारी डामरे तिवरे शाळेच्या विद्यार्थ्याची बस वेळेवर येत नसल्याने आमच्या मुलांचे वेळे अभावी हाल होत आहेत. तरी एस. टी. बस वेळेवर न आल्यास आम्ही ११ ऑक्टोंबर रोजी आम्ही रस्ता रोको, धरणे आंदोलन करणार आहोत. तरी ती एस.टी. बस शाळा भरण्याच्या आणि शाळा सुटण्याच्या वेळेत लवकरात लवकर सोडावी. त्याचप्रमाणे फोंड्यावरून  सकाळी ९.१० वा. डामरे- तिवरे – बेळणे मार्गे सुटणारी कणकवली ही बस एक वर्ष बंद आहे. ती चालू करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.