‘शांत बसावं अन्यथा शिवसैनिक…’; चंद्रकांत खैरेंचा बंडखोर आमदारांना इशारा

उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा समर्थन करताना नाही. पण, हा हल्ला का होतो? याचा विचार करायला पाहिजे. फुटलेले आमदार उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबतीत काहीही बोलत आहेत. नेत्यांना उलट बोलला तर सहन केलं जाणार नाही. आता तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहात तर शांत बसा, त्यांची तळी उचला आम्हाला काही म्हणणं नाही.

    औरंगाबाद – आता फुटले आहात तर शिंदेंची तळी उचला आमच्या नेत्यांवर बोलू नका नाही तर, शिवसैनिकाला राग येतो ते सोडणार नाहीत तुम्हाला. उदय सामंत यांच्या गाडीवर याच कारणावरून हल्ला झाला, असा इशारा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे. तर न्यायालयाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्याकडून लागू द्यावा, यासाठी आपण देवाला साकड घालत असल्याचं खैरे यांनी सांगितलं.

    उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा समर्थन करताना नाही. पण, हा हल्ला का होतो? याचा विचार करायला पाहिजे. फुटलेले आमदार उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबतीत काहीही बोलत आहेत. नेत्यांना उलट बोलला तर सहन केलं जाणार नाही. आता तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहात तर शांत बसा, त्यांची तळी उचला आम्हाला काही म्हणणं नाही. मात्र, अशा पद्धतीने वक्तव्य केलं तर परिणाम भोगावे लागतील. त्यात तानाजी सावंत म्हणतात की मी आदित्य ठाकरे यांना ओळखत नाही. त्यांच्या मागे मागे हा फिरायचा. तुम्ही शिक्षण सम्राट आहात म्हणून काय झालं. तुम्हालाही एक दिवस ईडी मागे लागेल. अशा कृत्यांमुळे शिवसैनिकांना राग येणारच, ते सोडणार नाही तुम्हाला, असा इशारा खैरे यांनी शिंदे गटातील आमदारांना दिला.