कोल्हापूरमध्ये परिस्थिती नियंत्रणात, इंटरनेट बंदमुळं कोट्यावधीचे व्यवहार थांबले; तर अनेकांचे हाल…अजूनपर्यंत किती जणांना अटक? वाचा…

या दंगलीचे पडसाद सर्वंत्र उमटले. त्यानंतर कोल्हापूरमध्ये इंटरनेट सेवा (Internet service) बंद करण्यात आली. सध्या कोल्हापूरमधील परिस्थिती नियंत्रणात असली तरी मात्र या दंगलीनंतर अनेकांचे हाल झाले आहेत, तर इंटरनेट बंदमुळं कोट्यावधीचे व्यवहार थंडावले आहेत.

    कोल्हापूर – (बुधवारी, 7 जून) कोल्हापूरमध्ये शहरातील सात तरुणांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला टिपू सुलतान आणि औरंगजेबाचे फोटो ठेवले आणि इथंच वादाची ठिणगी पडली. (Kolhapur Riots) त्यामुळे कोल्हापूरचे वातावरण चिघळले, लोकं रस्त्यावर उतरली होती. कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्रित येत आंदोलन करण्याची परवानगी पोलिसांकडे (Police) मागितली होती. परंतु पोलिसांनी कडक कारवाई करीत दंगल पांगवली आहे. या दंगलीचे पडसाद सर्वंत्र उमटले. त्यानंतर कोल्हापूरमध्ये इंटरनेट सेवा (Internet service) बंद करण्यात आली. सध्या कोल्हापूरमधील परिस्थिती नियंत्रणात असली तरी मात्र या दंगलीनंतर अनेकांचे हाल झाले आहेत, तर इंटरनेट बंदमुळं कोट्यावधीचे व्यवहार थंडावले आहेत.

    इंटरनेट सेवा बंदमुळं लोकांचे हाल…

    कोल्हापुरातील दंगलसदृश वातावरणामुळे इंटरनेट सेवा बंद ठेवल्यामुळे गुरुवारी मोबाइल आणि इंटरनेटद्वारे होणारे कोटय़वधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. इंटरनेट सेवा बंद झाल्यामुळे डिजिटल बँकिंग, डेबिट, क्रेडिट, मोबाईल वॉलेट ही अर्थविश्वातील दुनिया पूर्णत: ठप्प होती. यूपीआय पेमेंटद्वारे होणारे व्यवहारही बंद होते. ई – बँकिंग सेवेवरही परिणाम झाला. ग्राहकांना त्याचा त्रास सोसावा लागला. तर बँका, औद्योगिक-व्यापारी संस्था, शैक्षणिक संस्थांना फटका बसला. अनेकांनी तातडीच्या ‘ई – बँकिंग’ व्यवहारांसाठी सीमेलगतच्या कर्नाटकातील गावांसह सांगली जिल्ह्यात जाण्याचा पयार्य निवडला.

    राड्याप्रकरणी 36 जणांना अटक
    दरम्यान, कोल्हापूरमधील राड्याप्रकरणी पोलिसांची पत्रकार परिषद कोल्हापुरातील परिस्थिती पूर्वपदावर असल्याचं सांगितेले. राड्याप्रकरणी अद्यापर्यंत 36 जणांना अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवू नये, असे पोलील अधीक्षकांनी आवाहन केले आहे. संपूर्ण जिल्ह्यात बंदोबस्त करण्यात आला होता. शहरातील दुकानांच्या बाहेरील सीसीटीव्ही तपासणार. सीसीटीव्ही तपासून पुढील कारवाई करणार. सोशल मीडियावर स्टेटस ठेवणारे कॉलेजचे विद्यार्थी आहेत. एका मुलाचं स्टेटस इतरांनी कॉपी करुन ठेवलं, त्यामुळं वाद वाढला. असं पोलिसांनी म्हटलं आहे.