Sanjay Biyani Murder

प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्या हत्येतील सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली(Six accused arrested in murder of famous Nanded builder Sanjay Biyani after 55 days).

    नांदेड : प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्या हत्येतील सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली(Six accused arrested in murder of famous Nanded builder Sanjay Biyani after 55 days).

    या हत्येमागे पाकिस्तानात असलेला खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा याचा हात आहे. पंजाब, दिल्ली, हरियाणा,उत्तर प्रदेश, तेलंगणा, आणि कर्नाटक या सहा राज्यात आरोपींचा शोध घेण्यात आला पकडण्यात आलेले इंदरपालसिंग उर्फे सनी मेजर, मुक्तेश्वर उर्फ गोलू मंगनाळे, सतनामसिंग उर्फ सत्ता शेरगिल, हरदिपसिंग उर्फ सोनू बाजवा, गुरुमुखसिंग गिल, करणजितसिंघ साहू आरोपींचे नावं आहेत.

    सर्व आरोपी हे मुळचे नांदेडचे असल्याची माहितीही तांबोळी यांनी दिली. या प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग आहे तसेच बियाणींवर गोळीबार करणारे अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत. खंडणीसाठीच बियाणींची हत्या झाल्याचा पोलिसांचा निष्कर्ष आहे.

    दरम्यान सहाही आरोपींना न्यायालयाने दहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती ही तांबोळी यांनी दिली. आरोपींच्या शोधात पोलिस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, एसआयटी प्रमुख तथा अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्यासह 60 जणांची टिमने ही महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. अत्यंत क्लिष्ट असलेल्या प्रकरणाचा छडा लावणाऱ्या टिमचं निसार तांबोळी यांनी भरभरुन कौतुक केले.