देवमाशाची उलटीची तस्करी करणाऱ्या सहा आरोपींना अटक

अॅम्बरग्रीस हा सुगंधी पदार्थ आहो. तो फार दुर्मिळ मानल्या जातो. याचा वापर नैसर्गिक परफ्युम बनवण्यात केला जातो, हे परफ्युम किंवा अत्तरे फार महागडी असतात. त्यामुळे व्हेल माशाची उलटीची तस्करी करण्यात येते.

    सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील देवगड तालुक्यात देवमाशाची उलटी (Whale Vomit) ची तस्करी करणाऱ्या सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 12 किलो 370 ग्रॅम वजनाची ही उलटी जप्त करणयात आली असून आंतरराष्ट्रीय बाजारात तिची किंमत तब्बल 22 कोटी 37 लाख रुपये इतकी आहे.

    देवमासा अर्थात व्हेल माशाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून सहा आरोपींना ताब्यात घेतलं. सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषणने ही कारवाई केली आहे यामध्ये चार पुरुषांसह दोन महिलांचा समावेश आहे. या आरोपींविरोधात कलम 39, 42, 43, 44, 48, 51 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कारवाई दरम्यान, पलिसांनी आरोपींकडून 22 कोटी रुपयांच्या मुद्देमालासह दोन गाड्या जप्त केल्या आहेत.
    व्हेल माशाच्या उलटीला फार महत्व आहे. त्याच्या उलटीला अॅम्बरग्रीस (Ambergris) असही म्हण्टलं जात. अ‍ॅम्बरग्रीस हे राखाडी किंवा काळ्या रंगाचे घन पदार्थ असतो. अॅम्बरग्रीस हा सुगंधी पदार्थ आहो. तो फार दुर्मिळ मानल्या जातो. याचा वापर नैसर्गिक परफ्युम बनवण्यात केला जातो, हे परफ्युम किंवा अत्तरे फार महागडी असतात. त्यामुळे व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करण्यात येते. व्हेल माशाची उलटी किंवा अंबरग्रीस जमवणे आणि विकणे हे बेकायदेशीर आहे