येमेन देशाचे सहा नागरिक पुण्यातून हद्दपार; पुणे पोलिसांच्या विशेष शाखेची कारवाई

पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय पुण्यातील कोंढवा भागात गेल्या पाच वर्षांपासून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या येमेन देशाच्या सहा नागरिकांना पुणे पोलिसांच्या विशेष शाखेने हद्दपार केले आहे. विशेष शाखेने गेल्या काही दिवसांपासून या ऑपरेशनवर काम करून या नागरिकांना हद्दपार केले आहे. त्यांना येमेनमध्ये पाठविण्यात आले आहे.

    पुणे : पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय पुण्यातील कोंढवा भागात गेल्या पाच वर्षांपासून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या येमेन देशाच्या सहा नागरिकांना पुणे पोलिसांच्या विशेष शाखेने हद्दपार केले आहे. विशेष शाखेने गेल्या काही दिवसांपासून या ऑपरेशनवर काम करून या नागरिकांना हद्दपार केले आहे. त्यांना येमेनमध्ये पाठविण्यात आले आहे. अलखराज वालेद अब्दुराबुअतेह (वय ३७), साउदी अब्दुरबू अतेक अल खराज (वय ३४), हेबायाहना मोहम्मंद हुसेन (वय ३३) यांच्यासह तीन अल्पवयीनांना त्यांच्या देशात पाठविण्यात आले आहे.

    संबंधित सहा नागरिक २०१७ मध्ये विद्यार्थी व्हिसावर भारतात आले होते. ते पुण्यात राहत होते. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षव जगन्नाथ कळसकर, सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांच्या पथकाने कारवाई केली आहे. संबंधित परकिय नागरिक विद्यार्थी व्हिसावर २०१७ मध्ये आले होते. तेव्हापासून ते अवैधरित्या कोंढव्यात वास्तव्य करीत होते. त्यांना ऑक्टोबर २०२२ मध्ये एफआरओ कार्यालयाने ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यातील तीन अल्पवयीनांसह महिलेला हडपसर येथील रेस्क्यु फाऊंडेशनमध्ये ठेवण्यात आले. त्यांचा पासपोर्ट आणि व्हिसाची वैधता संपली होती. त्यानंतर येमेन देशाच्या दुतावासाकडे संपर्क साधण्यात आला होता.

    त्यांच्याकडून अवैधरित्या वास्तव्य होत असल्याने त्याबाबतची माहिती देण्यात आली. त्यांना येमेन देशाकडून परत पाठविण्याची माहिती प्राप्त करुन घेतली गेली. त्यांना त्यांच्या मुळ देशात पाठविण्याचे काम सुरू केले होते. परंतु, या नागरिकांनी त्यांच्याच देशात जाण्यास विरोध केला होता. त्यांनी एफ.आर.ओ. कार्यालयविरोधात थेट लष्कर न्यायालयात याचिका दाखल केली. ही याचिका न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर विशेष शाखेने येमेन दुतावासाचे मदतीने त्यांचे विमान तिकीट आरक्षित केले व मोठया शिफातीने २४ डिसेंबरला त्यांना हद्दपार करण्यात आले.