नागपूरमध्ये कारची ट्रकला धडक झाल्याने भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू

नागपूर - उमरेड मार्गावर विहीरगाव जवळ भरधाव तवेरा कारने ट्रक ला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की अपघातामध्ये तवेरा कार चक्काचूर झाली असून या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

    नागपूर : नागपुरात गुरुवारी रात्री १० च्या सुमारास भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर उमरेड मार्गावर विहीरगाव जवळील अड्याली फाट्याजवळ तवेरा कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, या अपघातात एक चिमुकली बचावली आहे. तिच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

    नागपूर – उमरेड मार्गावर विहीरगाव जवळ भरधाव तवेरा कारने ट्रक ला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की अपघातामध्ये तवेरा कार चक्काचूर झाली असून या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक महिलेसह पाच पुरुषांचा समावेश आहे. तर एक जण जखमी आहे. ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात तवेरा ट्रक वर जाऊन आदळली आणि समोरचा भाग चक्काचूर झाला.