कोल्ह्याच्या सहा पिल्लांना सोडले आईच्या कुशीत

हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे या गावात वन्यजीव बचाव पथकाने सहा पिल्लांना त्यांच्या आईच्या कुशीत सोडली.हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे गावात राहुल पाटील यांच्या उसाची तोडणी सुरू असताना ऊसतोड मजुरांना या शेतात कोल्ह्याची सहा नवजात पिल्ले निदर्शनास आली त्यांनी तात्काळ खोची येथील प्राणी मित्र तेजस जाधव यांच्याशी संपर्क साधून वनविभागाला या गोष्टीची माहिती दिली

    खोची : हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे या गावात वन्यजीव बचाव पथकाने सहा पिल्लांना त्यांच्या आईच्या कुशीत सोडली.हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे गावात राहुल पाटील यांच्या उसाची तोडणी सुरू असताना ऊसतोड मजुरांना या शेतात कोल्ह्याची सहा नवजात पिल्ले निदर्शनास आली त्यांनी तात्काळ खोची येथील प्राणी मित्र तेजस जाधव यांच्याशी संपर्क साधून वनविभागाला या गोष्टीची माहिती दिली त्यानुसार करवीर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्या रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाची वन्यजीव बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.

    यावेळी कोल्ह्याची नवजात पिल्ले ही अंदाजे २६ ते ३० दिवसाची असल्याने ती पिल्ले त्या पिलांच्या आई पर्यंत पोहोचवणे हे वन विभागासाठी एक आव्हान असताना कोल्हापूर वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक रामानुजम उपवन संरक्षक गुरुप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव बचाव पथकातील प्रदीप सुतार, अमोल चव्हाण, आशुतोष सुर्यवंशी, विनायक माळी यांनी पिल आईच्या स्वाधीन होई पर्यंत सलग २० तास खडा पहारा दिला. त्यामुळे भेंडवडे परिसरात वनविभाग अधिकाऱ्यांचे व वन्यजीव बचाव पथकाचे कौतुक होत आहे.