शिंदेंच्या गोटात शिवसेनेच्या ४६ आमदारांसह ६ अपक्ष आमदार दाखल

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि पर्यायाने महाविकास आघाडी सरकारला (MVA) आव्हान दिले आहे. जवळपास ४६ आमदार त्यांच्या सोबत असून ६ अपक्ष आमदार त्यांच्या गोटात (Group) दाखल झाल्याने सरकारची स्थिती दोलायमान (Vibrant) झाली आहे.

    मुंबई : सुरतमधून (Surat) शिवसेना आमदार (Shivsena MLA) गुवाहाटीला (Guwahati) पोहोचल्यानंतर मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि पर्यायाने महाविकास आघाडी सरकारला (MVA) आव्हान दिले आहे. जवळपास ४६ आमदार त्यांच्या सोबत असून ६ अपक्ष आमदार त्यांच्या गोटात (Group) दाखल झाल्याने सरकारची स्थिती दोलायमान (Vibrant) झाली आहे.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षावरून मातोश्रीकडे प्रस्थान केल आहे. तसेच, तुमचं म्हणणं असेल तर शिवसेना प्रमुखपदही सोडतो, असं ते म्हणाले. यानंतर आणखी ट्वीस्ट येणार हे स्पष्ट झाले. एकनाथ शिंदे यांनी सर्व सूत्र हातात घेतल्याचे स्पष्ट झाले असून त्यांनी कायदेशीरपणे जाण्याचा प्रयत्न केला आहे. तर, सूनील प्रभूला बघू, असे प्रताप सरनाईक म्हणाले.

    एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीला यश आले आहे. सेनेचे जवळपास ४६ आमदार शिंदे गटात सामील झाले आहेत. मुंबई, खान्देश, कोकण आणि मराठवाड्यातील मोठे संख्याबळ एकत्र करण्यात शिंदेंना यश आले आहे. तसेच, सहा अपक्षांमध्ये नरेंद्र भोंडेकर, आशिष जैस्वाल आणि बच्चू कडू गटातले अन्य काही आमदार सामील झाले आहेत.