Lightning strikes from the sky
संग्रहित फोटो

शनिवारी मराठवाड्यातील अनेक भागात दमदार पाऊस झाला. औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, बीड आणि हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र याचवेळी निसर्गाची अवकृपा सुद्धा पाहायला मिळाली. अंगावर वीज पडून जालना जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला तर, दोन जण जखमी झाले. औरंगाबाद जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला असून, नांदेड जिल्ह्यात एक जण जखमी झाला. दरम्यान प्रशासनाने शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे(Six killed in lightning strike in Marathwada).

    औरंगाबाद : शनिवारी मराठवाड्यातील अनेक भागात दमदार पाऊस झाला. औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, बीड आणि हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र याचवेळी निसर्गाची अवकृपा सुद्धा पाहायला मिळाली. अंगावर वीज पडून जालना जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला तर, दोन जण जखमी झाले. औरंगाबाद जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला असून, नांदेड जिल्ह्यात एक जण जखमी झाला. दरम्यान प्रशासनाने शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे(Six killed in lightning strike in Marathwada).

    औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यातील सावखेडा (उटाडेवाडी) येथील संजय नथ्थू उटाडे (वय ४५) हे आपल्या शेतात ठिबक सिंचनाच्या पाईपलाइनचे काम करत असताना दअंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. तर पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथे अंगावर वीज पडून गजानन हरिश्चंद्र दराडे (२७) या तरुणाचा मृत्यू झाला. तसेच आडगाव जावळे येथे सांडू शामराव नजन यांच्या घरावर वीज पडल्याने त्यांची बहीण सरुबाई शहादेव लांडे ( ४०) यांचा मृत्यू झाला.

    जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यातील कोदा येथे शनिवारी शेतात काम करत असताना वीज पडल्याने गंगाबाई पांडुरंग जाधव यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्याबरोबर असलेले दत्तात्रय जाधव व भारती जाधव हे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    मंठा तालुक्यातील पेवा येथील शेतकरी अनिल भारत शिंदे (वय २२) शनिवारी आपल्या शेतात काम करीत असताना वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. तर माळकिणी येथे दुपारी तीन वाजेच्या सुमारास शेतात काम करीत असताना वसंत वामनराव जाधव (५०) यांच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला.