सहा महिन्यांची मुलगी देवीचा अवतार; हिंगोलीतील प्रकाराने खळबळ

हिंगोली जिल्ह्यातील कापडसिंगी तांडा येथील सुभाष तनपुरे यांच्या कुटुंबात सहा महिन्यांपूर्वी एका चिमुरडीचा जन्म झाला. या चिमुकलीच्या कपाळावर कुंकवासारखा रंग दिसत होता. आता हा रंग जास्तच गडद दिसत आहे. त्यामुळे महिला या चिमुरडीला देवीचाच अवतार समजू लागल्या आहेत.

    हिंगोली : सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी येथे एका सहा महिन्यांच्या चिमुकलीच्या (New Born Baby) कपाळावर लाल आणि पिवळसर रंग दिसत असल्याने तिला देवीचाच अवतार (Godess Avtar) समजला जात आहे. तिच्या दर्शनासाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर परराज्यातून भाविक (Devotee) दाखल झाले आहेत. तसेच, येणाऱ्या महिलांच्या अंगात येत असल्याचे दिसून येत आहे.

    हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील कापडसिंगी तांडा येथील सुभाष तनपुरे यांच्या कुटुंबात सहा महिन्यांपूर्वी एका चिमुरडीचा जन्म झाला. या चिमुकलीच्या कपाळावर कुंकवासारखा (Red Forehead) रंग दिसत होता. आता हा रंग जास्तच गडद दिसत आहे. त्यामुळे महिला या चिमुरडीला देवीचाच अवतार समजू लागल्या आहेत. चिमुरडीला बघण्यासाठी महिला वर्ग एकच गर्दी करीत आहे. हिंगोली जिल्ह्यासह परराज्यातूनही भाविक दाखल होत आहेत. चिमुरडीची पूजाअर्चा केली जात आहे.

    अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गावात गोंधळ उडाला आहे. तसेच, येणाऱ्या महिलांच्या अंगामध्ये येत असल्याचे दिसते. सुभाष तनपुरे यांच्या घरात दीड महिन्यांपूर्वी जमिनीत दगडाच्या मूर्ती निघाल्या होत्या. त्यानंतर मुलीच्या कपाळावर मळवट भरलेले दिसले, तर काही दिवसांनी हातावर देखील मळवट दिसून येत होते.