नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात बस पलटी, सहा प्रवासी गंभीर जखमी

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात चरणमाळ घाटात आज सकाळी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 6 प्रवाशी जखमी झाले असून, जखमींना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    नवापूर : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात चरणमाळ घाटात आज सकाळी बसचा भीषण अपघात झाला.या अपघातात 6 प्रवाशी जखमी झाले असून जखमींना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास मालेगाव सुरत बसचा नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात एक्सल तोडून ब्रेक निकामी झाला. यामुळे बस घाटात अनियंत्रित होऊन खाई मध्ये कोसळली.

    दरम्यान या अपघातात 6 प्रवाशी गंभीर जखमी झाले असून, जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बसमध्ये एकूण 30 प्रवाशी होते. इतर प्रवाशी सुखरूप असून त्यांना इतर बस’ने रवाना करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व गावकऱ्यांनी मदत करून प्रवाश्यांना बाहेर काढले.