Six people died in different incidents in the district, 4 women were killed by lightning, youths drowned in the lake

शेगाव जवळील वायगाव भोयर येथे शेतात काम करणाऱ्या महिलांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. आज शनिवारी सायंकाळी चार वाजता अचानक वायगाव भोयर परिसरात मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस सुरू झाला. दरम्यान शेतात काम करणाऱ्या महिला आपापल्या घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. याचवेळी अचानक वीज अंगावर पडल्याने वायगाव येथील चौघांचा जागीच मृत्यू झाला.

  चंद्रपूर : शनिवारी झालेल्या पावसामुळे वरोरा तालुक्यातील (Warora Taluka) शेगाव जवळील वायगाव भोयर येथे वीज पडून चार महिलांचा मृत्यू झाला. गोंडपिपरी तालुक्यात विजेमुळे मेंदूची नस फाटल्याने एका शेतक-याचा मृत्यू झाला. तसेच बल्लारपूर तालुक्यातील (Ballarpur Taluka) जुनोना तलावातील ओव्हरफ्लो मधून बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या वेगवेगळ्या घटनांमध्ये जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

  याबाबत सविस्तर माहिती अशी की, शेगाव जवळील वायगाव भोयर येथे शेतात काम करणाऱ्या महिलांच्या अंगावर वीज कोसळल्याने (Due to lightning strike) त्यांचा जागीच मृत्यू झाला. आज शनिवारी सायंकाळी चार वाजता अचानक वायगाव भोयर परिसरात मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस सुरू झाला. दरम्यान शेतात काम करणाऱ्या महिला आपापल्या घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. याचवेळी अचानक वीज अंगावर पडल्याने वायगाव येथील चौघांचा जागीच मृत्यू (Four died on the spot) झाला.

  मृतांमध्ये हिरावती शालिक झाडे (वय ४५, रा. वायगाव भोयर), वरोरा पंचायत समितीच्या माजी सदस्य पार्वता रमेश झाडे (वय ६०), मधुमती सुरेश झाडे (२०) आणि रिना नामदेव गभणे (२०) यांचा समावेश आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. वीज पडून चार जणांचा मृत्यू झाल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी शेतमजुरांनी केली आहे.

  घटनेची माहिती मिळताच शेगावचे ठाणेदार अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रवीण जाधव, किशोर पिरके, महादेव सरोदे आदींनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी वरोरा उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.

  विजेने मेंदूची नस फाटली

  गोंडपिपरी तालुक्यातील चेकबोरगाव येथील शेतकरी शुक्रवारी आपल्या शेतात काम करत असताना अचानक पाऊस सुरू होवून विज पडल्यामुळे खरारपेठ येथील शेतात शेतकरी धनराज सुभाष निमगडे (५५) हे गंभीररित्या भाजले. त्यांच्या मेंदूची नस फाटल्याने त्यांना गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

  तलावाच्या वेस्टवेअर मध्ये बुडून तरुणाचा मृत्यू

  बल्लारपूर तालुक्यतील जुनोना तलावाचे वेस्टवेअर पाणी ओवर फ्लो होत आहे. यावेळी तलावाच्या वेस्टवेअरमध्ये डुबून एका तरुणाचा मृत्यू झाला. शुक्रवारी बल्लारपुरातील संतोषी माता वार्ड निवासी निवासी नंदलाल कैथवास हा त्याच्या जुनोना येथील शेतात धान रोवणी करण्‍यासाठी गेलेल्या मजुरांकरीता जेवण, नाश्ता, पाणी घेवून गेला होता. तेथून परत येत असताना नंदलाल आणि त्याच्या मित्रांना दिसले की, वेस्टवेअरच्या पाण्यात एक तरुण बुडत आहे. दोरीच्‍या सहायाने त्‍याला वाचावण्‍याचा प्रयत्‍न करीत असताना अचानक नंदलालचा पाय घसरला आणि तोही पाण्यात बुडाला व तलावातील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.

  यावेळी त्याच्या एका मित्राने पाण्यात उडी मारून नंदलालला शोधण्याचा प्रयत्न केला. पण तोही घसरला आणि पाण्यात गेला. यावेळी मदतीकरीता वरती पुलावर असलेल्या मित्रांनी पाण्यातून दोघांना वाचविले. मात्र नंदलाल सापडला नाही.

  पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून नंदलालचा शोध सुरू केला. मात्र, पाण्यात जलपर्णी अधिक असल्याने तो आढळून आला नाही. लवकरच अंधार शोध मोहिम थांबविण्यात आली. दरम्यान शनिवारी सकाळपासून पुन्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने शोधकार्य सुरू केले असता नंदलालचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.