Uddhav_vs_Shinde_1683767929665_1683767936904

विधिमंडळात होणाऱ्या या सुनावणीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटीस बजावण्यात आली आहे. शिवसेनेच्या 40 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोटीस बजावली आहे. त्यामुळ राज्यातील राजकारणाला या निर्णयामुळं कलाटणी देणारा निर्णय़ ठरणार आहे. संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे.

    मुंबई – राज्यात मागील वर्षी शिवसेनेत (Shivsena) मोठी फूट पडली. यानंतर शिंदे गट व ठाकरे गट अनेकवेळा आमनेसामने आलेत. शिंदे गटाने (Shinde Group) मोठे बंड केल्यानंतर भाजपासोबत सरकार स्थापन केले. यानंतर पक्षाचे चिन्ह व पक्षावर शिंदे गटाने आपला दावा सांगितला होता. यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्ट आणि त्यानंतर निवडणूक आयोगाकडे गेले. काही महिन्यांपूर्वी निवडणूक आयोगाने निकाल देताना, शिवसेना पक्ष व चिन्ह हे शिंदे गटाच्या शिवसेनेला दिले आहे. मात्र शिंदे गटाच्या बंडानंतर ठाकरे गटानं शिंदे गटातील १६ आमदार अपात्र आहेत, म्हणत न्यायालयात याचिका दाखल केली होती. वर्षभरानंतर कोर्टानं निकाल देताना, हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात चेंडू टोलावला आहे. यामुळं आता यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय घेणार आहेत. या प्रकरणी आज दिवसभर सुनावणी पार पडणार आहे. (sixteen mla disqualified hearing all day today mla of both groups will be present what did both groups say before the hearing)

    दोन्ही गटाचे आमदार उपस्थित राहणार…

    दरम्यान, शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या विरोधात असलेल्या या याचिकवर सुनावणी आता विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात होणार आहे. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणातील सुनावणी आज दुपारी १२ वाजता सुनावणील सुरुवात होणार आहे. एकाच दिवशी सर्व आमदारांची सुनावणी होणार आहे. दोन्ही गटातील आमदारांची ही सुनावणी एकाच दिवशी होणार आहे. राज्यातील राजकारणाला कलाटणी ठरू शकते, इतकेच नाही तर एकाच दिवशी तब्बल 34 याचिकांवर विधानसभा अध्यक्ष सर्व आमदारांची सुनावणी घेणार असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी दोन्ही गटातील आमदारांना उपस्थित राहण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहेत.

    दोन्ही गटांना नोटीस 

    अध्यक्षांनी दोन्ही गटाच्या आमदारांना नोटीसा पाठवल्या होत्या. या दोन्ही गटाकडून उत्तर मिळाले असून, यावर आज सुनावणी होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर आमदार अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आला होता. त्यानुसार यात वादी आणि प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करत म्हणणे मांडण्याची संधी दिली जाणार आहे. विधिमंडळात होणाऱ्या या सुनावणीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटीस बजावण्यात आली आहे. शिवसेनेच्या 40 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोटीस बजावली आहे. त्यामुळ राज्यातील राजकारणाला या निर्णयामुळं कलाटणी देणारा निर्णय़ ठरणार आहे. संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे.