उद्धव ठाकरेंना फटके द्यायला पाहिजे, निलेश राणेंची जीभ घसरली

रविवारी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर अमरावतीत काही शिवसैनिकांनी हल्ला केला होता. बांगर आपली बहीण आणि पत्नीसह देवदर्शनाला आले होते. यावेळी दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला चढवला.

    मुंबई – उद्धव ठाकरेंची अवस्था पिसाळलेल्या कुत्र्यासारखी झाली आहे. पिसाळलेल्या कुत्र्याचे काय करायचे, हे मला वेगळे सांगायची गरज नाही. त्यांना फटके द्यायला पाहिजे, अशा शब्दांमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे पुत्र निलेश राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मात्र विरोध करताना राणेंची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले.

    रविवारी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर अमरावतीत काही शिवसैनिकांनी हल्ला केला होता. बांगर आपली बहीण आणि पत्नीसह देवदर्शनाला आले होते. यावेळी दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला चढवला. यावरुन भाजप नेते निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर शाब्दिक हल्ला केला आहे. सिंधुदुर्गमध्ये त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

    राणे म्हणाले, ते चांगल्या भाषेत ऐकणार नाही. त्यांना फटके द्यायला पाहिजे. उद्धव ठाकरे पिसाळले आहेत की, त्यांना काय करावे हेच सुचत नाहीये आणि पिसाळलेल्या कुत्र्याचे काय करायचे? हे मला वेगळे सांगायची गरज नाही. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल.