उल्हासनगरमध्ये स्लब कोसळून चौघांचा मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरु

उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) एक दुर्घटना घडली आहे. एका इमारतीचा काही भाग कोसळून स्लॅब कोसळून (Slub collapse) चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर अनेकजण अडकल्याची भीती आहे. दरम्यान उल्हासनगरमध्ये एका आठवड्याची ही दुसरी घटना आहे.

    उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) एक दुर्घटना घडली आहे. एका इमारतीचा काही भाग कोसळून स्लॅब कोसळून (Slub collapse)  चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर अनेकजण अडकल्याची भीती आहे. दरम्यान उल्हासनगरमध्ये एका आठवड्याची ही दुसरी घटना आहे. घटनेनंतर अग्नीशमन (fire bridge) दलाला पाचरण करण्यात आले असून, अडकलेल्यांना मदत करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.

    दरम्यान, उल्हासनगरमध्ये इमारतीचे स्लॅब कोसळण्याची एका आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. त्यामुळं आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून, या घटनेमुळं इमारत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उल्हासनगर कॅम्प ५ येथे असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब सकाळी बाराच्या सुमारास पडला, असे अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, ३० फ्लॅट असलेली रचना बेकायदेशीर आहे आणि आधीच नोटीस बजावण्यात आली आहे. या इमारतीत अजूनही पाच कुटुंबे राहत असल्याचे त्यांनी सांगितले.