
घरफोड्यांचा शहरात धुमाकूळ सुरूच असून, लोहगाव भागात एका रात्रीत तीन बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांवर डल्ला मारला आहे. तीन घरफोड्यात सव्वा सहा लाखांचा ऐवज चोरीस गेला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात पांडुरंग टाचतोडे (वय ३५) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुणे : घरफोड्यांचा शहरात धुमाकूळ सुरूच असून, लोहगाव भागात एका रात्रीत तीन बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांवर डल्ला मारला आहे. तीन घरफोड्यात सव्वा सहा लाखांचा ऐवज चोरीस गेला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात पांडुरंग टाचतोडे (वय ३५) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार कोपर आळी येथे राहतात. तक्रारदार घराला कुलूप लावून गेल्यानतंर चोरट्यांनी सेफ्टी दरवाजाचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला व घरातील २ लाख १४ हजारांचा ऐवज चोरला. तर, त्यांच्या शेजारील श्रवणकुमार शेशमणी यांचे बंद देखील फोडून ३ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. त्यासोबतच या भागातील एका सोसायटीतील एका महिलेचा बंद फ्लॅट फोडून सव्वा लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. या घरफोड्या ९ ते १४ डिसेंबर या कालावधीत घडल्या आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.