घरफोड्यांचा धुमाकूळ; ४ फ्लॅट फोडले, साडे बारा लाखांचा ऐवज पळविला

पुण्यात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पुन्हा शहरातील विविध भागातील चार फ्लॅट फोडत चोरट्यांनी तब्बल साडे चार लाखांचा ऐवज चोरून पोबारा केला आहे. येरवडा, चंदननगर व हडपसर या घटना घडल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून शहरात घरफोड्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे.

    पुणे :  पुण्यात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पुन्हा शहरातील विविध भागातील चार फ्लॅट फोडत चोरट्यांनी तब्बल साडे चार लाखांचा ऐवज चोरून पोबारा केला आहे. येरवडा, चंदननगर व हडपसर या घटना घडल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून शहरात घरफोड्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे.

    याप्रकरणी असीला अब्दुल हुसेन काचवाला (वय ६०) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ६ ते १० ऑक्टोंबरच्या कालावधीत घडला आहे. तक्रारदारांचा कल्याणीनगर येथील मार्स सोसायटीत बंगला आहे. दरम्यान, ते काही कामानिमित्त बंगला लॉककरून गेले होते. त्यादरम्यान, चोरट्यांनी बंगल्याच्या खिडकीचे ग्रील कशाच्या तरी सहाय्याने उचकटून आतील १० लाख ४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. त्यासोबतच याच परिसरातील आणखी दोन ठिकाणी चोरी केली आहे.

    दुसरा प्रकार चंदननगरमध्ये घडला असून, चोरट्यांनी पवन वसंत साळुंखे (वय ३१) यांचा खराडीमधील बंद फ्लॅट फोडत १ लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे. तिसरी घटना देखील चंदननगरमध्येच घडली असून, चोरट्यांनी ऐ-वन मोबाईल शॉपी फोडत ८ मोबाईल चोरून नेले आहेत. तर चौथी घटना फुरसुंगी येथे घडली असून, चोरट्यांनी घराचे कुलूप उचकटून २९ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.