
Snehal of Hinjewadi wins gold medal in Asian Games
पिंपरी : चायना येथे झालेल्या २ अक्टूबर २०२३ ते ७ अक्टूबर २०२३ या वेळेस १९ वी आशियायी क्रिडा येथे पार पडली. या स्पर्धेमध्ये भारताच्या कबड्डी संघाकडून प्रतिनिधीत्व करण्यासाठी भारतातून 12 मुलींची अंतिम निवड करण्यात आली होती. या निवड झालेल्या खेळाडूंमध्ये हिंजवडीच्या सुनबाई तसेच महाराष्ट्रातून एकमेव अशा कबड्डीपटू स्नेहल शिंदे-साखरे हिची निवड करण्यात आली होती.
19 वी आशियाई क्रीडा स्पर्धा
भारतीय संघात निवड झाल्यानंतर आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर 19 वी आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये स्नेहल शिंदे – साखरे हिने सुवर्णपदक मिळाले असून, आयटी नगरीच्या सर्व पंचक्रोशी मध्ये अभिनंदन होत आहे.
भारतासाठी कबड्डी संघामध्ये प्रतिनिधित्व
स्नेहल हिने आजपर्यंत चार वेळा भारतासाठी कबड्डी संघामध्ये प्रतिनिधित्व करून चार वेळा सुवर्णपदकाची कमाई केलेली आहे. तसेच२०१२-१३ साली महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे.
अडीच वर्षापासून जिम्नॅस्टिकला
स्नेहल हि वयाच्या अडीच वर्षापासून जिम्नॅस्टिकला जात होती. वयाच्या चौथ्या वर्षापासून कबड्डीची आवड निर्माण झाली. वडील प्रदीपरामचंद्र शिंदे जमशेदपूर येथे झालेल्या जुनियर बॉक्सिंग
नॅशनल स्पर्धेत 1984 साली सुवर्णपदक विजेते असून पुणे पोलीस दलामध्येपोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. भाऊ निखिल प्रदीप शिंदे हादेखील फुटबॉल खेळाडू असलेल्या कारणामुळे खेळाचे बाळकडू हे त्यांना लहानपणापासूनच मिळाल्यामुळे आज यशाच्या शिखरावरती आहेत.
आयटी नगरीच्या सुनबाई
स्नेहल शिंदे हिचे लग्न ऑक्टोंबर 2021 मध्ये साखरे घराण्यात झाले आणि त्या आयटी नगरीच्या सुनबाई झाल्या. त्यांच्या सासरी नवरासागर दत्तात्रय साखरे व सासू स्वाती दत्तात्रय साखरे हे असतात. सासरी आल्यानंतरही खेळात सासू आणि पती यांनी वेळोवेळी प्रोत्साहित केले. पती सागर साखरे हे हिंजवडीचे युवा उद्योजक असून सासू स्वाती दत्तात्रय साखरे या हिंदुस्तान अँटिबायोटिक्स लिमिटेडकंपनीमध्ये कामाला होत्या.