…तर दादा तुम्ही आमच्याकडे या; दीपक केसरकरांची अजितदादांना ऑफर आणि अजित पवारांचे मिश्किल उत्तर, ऐकाल तर तुम्हालाही…

दादा, तुमची पक्षात घुसमट होत आहे..., तुम्ही आमच्याकडे या...तुम्हाला योग्य तो न्याय, सन्मान देऊ अशी हटके ऑफर मंत्री दीपक केसरकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना दिली आहे, त्यामुळं सर्वांचाच भुवया उंचावल्या आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिउत्तर देत केसरकरांची ऑफर फेटाळून लावली आहे.

    मुंबई- सध्या शिंदे-फडणवीस सरकारचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरु आहे. यात सत्ताधारी ऐकमेकांवर चिखलफेक करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान, सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते व मंत्री दीपक केसकरकर हे कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चांगलेच चर्चेत येत आहेत. आता मंत्री केसरकर हे एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहेत. मंत्री दीपक केसरकर यांनी विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना एक वेगळीच व हटके ऑफर दिली आहे.

    दादा, तुमची पक्षात घुसमट होत आहे…, तुम्ही आमच्याकडे या…तुम्हाला योग्य तो न्याय, सन्मान देऊ अशी हटके ऑफर मंत्री दीपक केसरकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना दिली आहे, त्यामुळं सर्वांचाच भुवया उंचावल्या आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिउत्तर देत केसरकरांची ऑफर फेटाळून लावली आहे. अजित पवार राज्याच्या ‘राजकारणातील सिंह’ असून त्यांना ‘लांडग्या – कोल्हयांच्या’ टोळीत समावेश होण्याची आवश्यकता नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले आहे.

    दादा, तुमची पक्षात घुसमट होत आहे…, तुम्ही आमच्याकडे या…तुम्हाला योग्य तो न्याय, सन्मान देऊ अशी हटके ऑफर मंत्री दीपक केसरकरांनी अजित पवारांना दिली होती, यावर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार सडेतोड उत्तर दिलं आहे. अजित पवार हे राज्याच्या ‘राजकारणातील सिंह’ आहेत त्यामुळे त्यांना लांडग्या – कोल्हयांच्या टोळीत समावेश होण्याची आवश्यकता नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिपक केसरकर यांना सडेतोड उत्तर दिले आहे. मंत्री दिपक केसरकर आणि भाजप आमदार प्रविण पोटे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा महेश तपासे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. अजित पवार हे नक्कीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार मात्र ‘वक्त भी हमारा होगा और पार्टी भी राष्ट्रवादी होगी’ असेही महेश तपासे यांनी आमदार प्रविण पोटे यांना सुनावले आहे.