hasan mushrif

कोल्हापूरच्या गोकूळ संघाने दुधाच्या उत्पादन क्षमतेत वाढ करून मुंबई- पुणे येथील बाजारपेठे वर वर्चस्व संपादन करावे, असे आवाहन कोल्हापूरचे पालक मंत्री तथा वैद्यकीय सहाय्यता मंत्री हसन मुश्रीफ यांनी आर्दाळ (ता. आजरा) येथील श्री महालक्ष्मी दूध संस्थेच्या रौप्य महोत्सवी व नूतन इमारत उद्घाटन प्रसंगी केले.

    उत्तूर :  कोल्हापूरच्या गोकूळ संघाने दुधाच्या उत्पादन क्षमतेत वाढ करून मुंबई- पुणे येथील बाजारपेठे वर वर्चस्व संपादन करावे, असे आवाहन कोल्हापूरचे पालक मंत्री तथा वैद्यकीय सहाय्यता मंत्री हसन मुश्रीफ यांनी आर्दाळ (ता. आजरा) येथील श्री महालक्ष्मी दूध संस्थेच्या रौप्य महोत्सवी व नूतन इमारत उद्घाटन प्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  गोकूळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे होते. मंत्री मुश्रीफ यांचे हस्ते नूतन इमारतीचे उद्घाटन व जास्तीत दूध उत्पादकांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या प्रगतीचा आढावा संस्थापक तानाजी पाटील यांनी सांगितला.

    मुश्रीफ पुढे म्हणाले, शेतकऱ्यांनी चांगली जनावारे पाळून त्याची जोपासना करावी, भविष्यात अमोल दूधची स्पर्धा करावी लागणार आहे. गोकूळमध्ये सत्तापरिवर्तन झाल्यानंतर म्हैशाच्या दरात ११ रु तर गायीच्या दरात ८ रूपयांनी वाढ केली. पावडर व बटर यांचे दर कमी झाल्याने गायीच्या दरात वाढ झाली नाही. पावडर व बटरची मागणी वाढल्यास गायीच्या दुधात वाढ होईल. आंबेओहोळ प्रकल्पांतील शिल्लक विस्थापितांचे पुर्नवर्सन पुर्ण होण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे. यावेळी रवींद्र आपटे, गोकूळच्या संचालिका अंजना रेडेकर, उमेश आपटे, शंकर पावले यांची भाषणे झाली.

    कार्यक्रमास सरपंच रुपाली पाटील, उपसरपंच विद्याधर गुरव ,वसंत धुरे, मारुती घोरपडे, विष्णूपंत केसरकर, अनिकेत कवळेकर, दिपक देसाई, अमोल बांबरे, सचिन पावले, विजय वांगणेकर, संपत देसाई, तानाजी डोंगरे, विकास चोथे, नामदेव नार्वेकर, रामदास आजगेकर, संजय येजरे, विक्रम पाटील, आदी सह दूध उत्पादक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्तविक तानाजी पाटील तर शरद पाटील यांनी सुत्रसंचालन केले. वैशाली पाटील यांनी आभार मानले. आंबेओहोळ प्रकल्प ग्रस्तांवर दाखल झालेल्या केसीस् मागे घेण्यासाठी आपण प्रयत्न करू याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचेशी चर्चा करून मार्ग काढू असा दिलासा ही प्रकल्पग्रस्तांना मुश्रीफ यांनी दिला.