मुख्यमंत्र्यांसह ‘एवढे मंत्री’ हिवाळी अधिवेशनात अडचणीत, चार मंत्रीही विरोधकांच्या रडारवर, कोण आहेत हे मंत्री?  

हिवाळी अधिवेशन जसं अनेक मुद्यांनी गाजत आहे, तसे ते मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीमुळं अनेक मंत्री अडचणीत सापडेले आहेत. आता आणखी तीन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोध करत आहेत. तसेच यावरुनच विरोधकांनी ठिय्या आंदोलन करत आहेत.

  नागपूर : नागपुरात शिंदे-फडणवीस सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात सामान्यांचे प्रश्न मांडले जात असतात, सर्वसामान्यांच्या, मजुरांच्या, तरुणांच्या, महिलांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर समस्येवर चर्चा होणे अपेक्षित आहे. मात्र या अधिवेशनात सत्ताधारी व विरोधक ऐकमेकांची उणीधुणी काढत चिखलफेक करत आहेत. या अधिवेशनात सत्ताधारी व विरोधक आमनेसामने येत कुरघोडी व सूडाचे राजकारण करताना दिसत आहेत. या अधिवेशनात सीमावाद, नागपूर न्यास जमीन विक्री घोटाळा, सुशात सिंग राजपूत व दिशा सालियान मृत्यू प्रकरण, ‘ईएस’ प्रकरण, गायरान जमीन घोटाळा, सीमावाद यावरुन अधिवेशन चांगलेच गाजत आहे.

  हे सुद्धा वाचा

   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

   दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात नागपूर न्यास जमीन विक्री घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावर विरोधकांनी गदारोळ घातला. तसेच ठाण्यातील सूरज परमार प्रकरणी ‘ईएस’ उल्लेख आढळल्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावर विरोधक अजूनही ठाम आहेत, यावरुन विरोकांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

   मंत्री अब्दुल सत्तार

   गायरान जमीन घोटाळ्याप्रकरणी यात १०० कोटीचा घोटाळा केल्याचा ठपका मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर ठेवण्यात आला आहे, दरम्यान, यावर विरोधक आक्रमक झाले असून, सत्तारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

   मंत्री संजय राठोड

   मविआ सरकारमध्ये टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राजीनामा द्यावा लागलेले मंत्री संजय राठोड देखील या सरकारमध्ये गायरान जमीन घोटाळ्याप्रकरणी अडचणीत आले असून, या घोटाळ्यात सत्तारांसह राठोडांचा देखील सहभाग असल्यामुळं त्यांच्या राजीम्याची मागणी विरोधकांनी केली आहे.

   मंत्री दादा भुसे

   दादा भुसे हे तरुणाला शिवीगाळ करत मारहाण करत असल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Video Viral) होत आहे. मंत्री दादा भुसे फटकावतात. शिव्या देतात. मुख्यमंत्री साहेब, कुठला गुन्हा पोलिस घेणार? असे आव्हाड यांनी हा व्हिडिओ शेअर करुन म्हटले आहे. तरुणाला धमकावल्याचा आरोप त्या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हाड यांच्याकडून करण्यात आला आहे. यावरुन भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे.

   मंत्री उदय सामंत आणि शंभूराज देसाई

   दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे, सत्तार, भुसे आणि राठोड अनेक प्रकरणामुळं अडचणीत आले असताना, आता मंत्री उदय सामंत व शंभूराज देसाई यांच्या देखील राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यामुळं हे अधिवेशन जसं अनेक मुद्यांनी गाजत आहे, तसे ते मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीमुळं अनेक मंत्री अडचणीत सापडेले आहेत.