खासदार संजय राऊत यांचं मोठं विधान; म्हणाले, ‘…तर राज ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात’

महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यात आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राजकीय परिस्थितीविषयी भाष्य केले. ‘देशात लोकशाही आहे. कोणीही मुख्यमंत्री होऊ शकतो. आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. त्यांच्याकडे बहुमत असेल तर होऊ शकतात’, अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याबाबत विधान केले.

गुढीपाडव्याच्या सणानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा होणार आहे. शिवाजी पार्कवर होणाऱ्या या मेळाव्यासाठी मनसैनिकांकडून जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, मेळाव्यापूर्वी शिवाजी पार्क परिसरात आणि शिवसेना भवनासमोर मनसेकडून लावण्यात आलेले पोस्टर सर्वाचं लक्ष वेधून घेत आहेत. या पोस्टरवर जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री म्हणून राज ठाकरे यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या पोस्टरबाबत संजय राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘देशात लोकशाही आहे. कोणीही मुख्यमंत्री होऊ शकतो. आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. त्यांच्याकडे बहुमत असेल तर होऊ शकतात. बहुमत हे चंचल असतं. आज आमच्याकडे असेल उद्या दुसऱ्या कोणाकडे असेल.’

मनसेचा मेळावा आज

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला मेळावा सुरु केला आहे. शिवसेनेप्रमाणे या मेळाव्याचीही जय्यत तयारी केली जाते. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातून या मेळाव्यासाठी मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी हे राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी येतात. त्यामुळं गुढीपाडव्याच्या सभेला मोठं महत्त्व आहे.

राज ठाकरे कोणाला करणार लक्ष्य?

मनसेचा आज मेळावा होत आहे. या गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थावर राज ठाकरे नेमकी कोणावर तोफ डागणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. त्यानुसार, मनसेकडून शक्तिप्रदर्शन करण्यात आलं असून, शिवसेना भवन समोर बॅनरबाजी करत शिवसेनेला (ठाकरे गट) लक्ष्य केले जात आहे.