महामुलकर कुटुंबियांनी जोपासला सामाजिक वारसा; केली आर्थिक मदत

दरे बुद्रुक (ता.जावली) येथील वारकरी संप्रदाय व सामाजिक कार्यात असणारे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व पुण्यकर्मी लक्ष्मणराव नाना महामुलकर यांच्या द्वितीय पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांच्या कुटुंबियांनी जिल्हा परिषद शाळा दरे बुद्रुक व विलासपूरमधील सेवाभावी संस्था यांना आर्थिक मदतीचा हातभार लावत वडिलांचा सामाजिक वारसा जोपासण्याचा काम केले आहे.

    सातारा : दरे बुद्रुक (ता.जावली) येथील वारकरी संप्रदाय व सामाजिक कार्यात असणारे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व पुण्यकर्मी लक्ष्मणराव नाना महामुलकर यांच्या द्वितीय पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांच्या कुटुंबियांनी जिल्हा परिषद शाळा दरे बुद्रुक व विलासपूरमधील सेवाभावी संस्था यांना आर्थिक मदतीचा हातभार लावत वडिलांचा सामाजिक वारसा जोपासण्याचा काम केले आहे.

    तसेच आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र परिवार व अजिंक्य जेष्ठ नागरिक संघ यांच्या पाठपुराव्याने गोडोली आरोग्य केंद्र व जिव्हिका हेल्थ केअर यांच्या माध्यमातून विलासपूर आणि परिसरातील १२ वर्षे पुढील सर्व मुले नागरिक व फ्रंटलाइन वर्कर यांच्यासाठी आयोजित केलेले मोफत कोविड १९ लसीकरण शिबिर फॉरेस्ट कॉलनीतील स्व. अभयसिहराजे भोसले सभागृहात बँक कर्मचारी, तरुण मुले जेष्ठ नागरिक यांच्या उपस्थितत मोठ्या प्रतिसादात पार पडले.

    यावेळी जिव्हिकाचे इर्शाद तांबोळी, डॉ. मेघा अनुगडे, नलिनी भिसे, गौरव जाधव, विक्रम पिसाळ, गणेश कांबळे, रुपाली जाधव या टीमने काळजीपूर्वक लसीकरण केले. अनेक ज्येष्ठ व तरुणांनी या शिबिराबाबत समाधान व्यक्त केले.

    शिबिर यशस्वी करण्यासाठी अजिंक्य ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रघुनाथ मोटे, शशिकांत पारेख तसेच शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र परिवारचे बाळासाहेब महामुलकर, युवराज जाधव, निलेश निकम, श्रीराम राजमाने यांनी मोलाचे परिश्रम घेतले.