anjali damania

आज झालेल्या या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकूण १८ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यामध्ये भाजपाचे ९ तर शिंदे गटाच्या ९ मंत्र्यांना स्थान देण्यात आले आहे. या मंत्रिमंडळ विस्तारानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania Reaction On Maharashtra Cabinet Expansion) यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

    मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा आज विस्तार (Cabinet Expansion) झाला आहे. आज झालेल्या या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकूण १८ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यामध्ये भाजपाचे ९ तर शिंदे गटाच्या ९ मंत्र्यांना स्थान देण्यात आले आहे. या मंत्रिमंडळ विस्तारानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania Reaction On Maharashtra Cabinet Expansion) यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

    अंजली दमानिया आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “दोन नावं बघून खूप वाईट वाटलं. संजय राठोड? अशा माणसाला मंत्रिपद कसं देऊ शकतात? अब्दुल सत्तार? यांना मंत्रिपद द्यायची इतकी घाई का? घोटाळ्याची चौकशी तर होऊ द्यायची होती. परत ये रे माझ्या मागल्या सुरू. एका माळेचे मणी”.

    मंत्रिमंडळामध्ये एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही. त्यावरून अंजली दमानिया यांनी आणखी एका ट्विटमध्ये एकही स्त्री मंत्रिपदासाठी योग्य नाही का? असा प्रश्न विचारला आहे.

    अंजली दमानिया यांनी राज्य मंत्रिमंडळात शपथ घेतेलेल्या संजय राठोड आणि अब्दुल सत्तार या दोन मंत्र्यांवर आक्षेप घेतला आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात संजय राठोड यांचे नाव पुढे आले होेते. तसेच, अब्दुल सत्तार यांच्या मुलींची प्रमाणपत्र टीईटी घोटाळा प्रकरणात रद्द झाल्यामुळे त्यांच्यावरही दमानियांनी आक्षेप घेतला आहे.