
प्रकाश आमटे यांना तात्पुरता डिस्चार्ज (Prakash Amte Got Discharge) मिळाला आहे. अनिकेत आमटे (Aniket Amte) यांनी फेसबुक पोस्टच्या (Facebook Post) माध्यमातून ही माहिती दिली आहे.
समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे (Dr. Prakash Amte) यांना ब्लड कॅन्सरचे निदान (Lukemia Blood Cancer) झाले आहे. प्रकाश आमटे यांना तात्पुरता डिस्चार्ज (Prakash Amte Got Discharge) मिळाला आहे. अनिकेत आमटे यांनी सांगितलं की प्रकाश आमटेंच्या पुढील तपासण्या सुरु आहेत. अनिकेत आमटे (Aniket Amte) यांनी फेसबुक पोस्टच्या (Facebook Post) माध्यमातून ही माहिती दिली आहे. उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पुढील तपासण्या पुढील २-३ दिवसात होणार आहे. लवकरच त्यांच्यावर केमोथेरपी सुरु होणार आहे. पुण्यातील रुग्णालयात त्यांच्या उपचार होणार आहे.
अनिकेत आमटे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे की,“बाबांची तब्येत आज बरी आहे. आज सध्या पुरता डिस्चार्ज मिळाला आहे. २-३ दिवसांनी चेक अप होईल. परत रक्ताच्या सर्व टेस्ट करतील आणि ब्लड व्हॅल्यूज ठीक असल्यास लवकरच (८-१० दिवसात) किमो थेरपी सुरू करतील. पुढील साधारण महिनाभर ट्रीटमेंट पुण्यातच होणार आहे. बाबांचा आजचा फोटो सोबत जोडला आहे रुमानी सोबतचा. पेशंट कसा असावा याचे आयडीयल उदाहरण आहेत बाबा. DMH दवाखान्यातील अतिशय आपुलकीने ट्रीटमेंट करणारे डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, मामा मावश्या सर्वांचे आभार. आपण सर्वांच्या शुभेच्छा धीर द्यायला सोबत आहेतच.”