Let's overcome corona and build health; Happy New Year to Chief Minister Uddhav Thackeray

सोलापूर जिल्ह्यातील चिंचपूर ग्रामपंचायतीत (Chinchpur Gram Panchayat of Solapur District) उद्धव ठाकरे गटाचा विजय झाला आहे. (shivsena win) या ग्रामपंचायतीत 7 पैकी 7 जागा ठाकरे गटाने जिंकल्या आहेत. त्यामुळं शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला असून, शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

    सोलापूर : शिवसेनेच्या 39 आमदारांनी बंड करत शिंदे गटाची स्थापन केलीस त्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (CM Eknath shinde) झाले. तर देवेंद्र फडणवीस (Devendra fadnvis) उपमुख्यमंत्री झाले. शिवसेना (Shivsena) पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाचे हा प्रश्न न्यायप्रविष्ठ आहे, शिंदे गटातील बंडानंतर शिवेसेनेला मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. आमदारांसह 12 खासदारांनी सुद्धा शिंदे गटात प्रवेश केला आहे, तसेच ठाणे, नवी मुंबई, कल्याण, अंबरनाथ, भाईंदर आदी पालिकेतील नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवेसेनेला अभूतपूर्व भगदाड पडले आहे. पण त्यानंतर शिवसेनेसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील चिंचपूर ग्रामपंचायतीत (Chinchpur Gram Panchayat of Solapur District) उद्धव ठाकरे गटाचा विजय झाला आहे. (shivsena win) या ग्रामपंचायतीत 7 पैकी 7 जागा ठाकरे गटाने जिंकल्या आहेत. त्यामुळं शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला असून, शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

    दरम्यान, चिंचपूरच्या या निकालामुळे भाजपाचे नेते सुभाष देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे. सोलापूरात देशमुख यांचे वर्चस्व आहे. सोलापूर जिल्ह्यातील चिंचपूर ग्रामपंचायतीत उद्धव ठाकरे गटाचा विजय झाला आहे. या ग्रामपंचायतीत 7 पैकी 7 जागा ठाकरे गटाने जिंकल्या आहेत. त्यामुळं भाजप व शिंदे गटाला धक्का बसला आहे. तर शिवसेनेत आनंद, जल्लोष व्यक्त केला जात आहे. दरम्यान, राज्यातील सत्तापेच कायम असतानाच १५ जिल्ह्यातील २३८ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकांचा निकाल आज लागत आहे. पुणे – १७ , सोलापूर – २५, सातारा – ७, सांगली – १, नाशिक – ३६,  धुळे – ४१, जळगाव – २०, अहमदनगर – १३, उस्मानाबाद – ९, जालना – २७, लातूर – ६, औरंगाबाद – १६, बीड – १३, परभणी – २, आणि बुलडाणा – ५ या ग्रामपांचायींच्या निवडणूकीचे आज निकाल लागणार आहेत.