महाआवास अभियानात सोलापूर जिल्हा राज्यात द्वितीय : सीईओ  दिलीप स्वामी 

महाआवास अभियानात सोलापूर जिल्हा राज्यात द्वितीय स्तरावर आहे. हा क्रम खाली येऊ देऊ नका. गरीबांची घरे वेळेत पुर्ण करा असे आवाहन असे सीईओ दिलीप स्वामी यांनी केले.  जिल्हा परिषदेमध्ये आज महाआवास अभियानाबाबत गटविकास अधिकारी यांची बैठक घेण्यात आली.

  सोलापूर :  महाआवास अभियानात सोलापूर जिल्हा राज्यात द्वितीय स्तरावर आहे. हा क्रम खाली येऊ देऊ नका. गरीबांची घरे वेळेत पुर्ण करा असे आवाहन असे सीईओ दिलीप स्वामी यांनी केले.  जिल्हा परिषदेमध्ये आज महाआवास अभियानाबाबत गटविकास अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रकल्प संचालक संतोष धोत्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांचे सह गटविकास अधिकारी उपस्थित होते.
  या प्रसंगी पंचायत राज समितीने नाविन्यपूर्ण योजना राबविल्याबद्दल सीईओ दिलीप स्वामी यांचे विविध अभिनंदनाचे ठराव करण्यात आले. याबद्दल सर्व गटविकास अधिकारी यांच्यावतीने  सीईओ स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
  महा आवास अभियानात सोलापूर जिल्हा राज्यात दुसरे क्रमांकावर आहे. टाॅप थ्री मध्ये जिल्हा रहावा या साठी सर्वानी प्रयत्न करा. गरीबांची घरे पूर्ण केल्यास आशिर्वाद मिळतील,  असे भावनिक आवाहन स्वामी यांनी  केले.
  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे म्हणाले, “रोजगार हमी योजनेचा कृती संगम, घरकुलाचे पहिल्या हप्त्याचे वितरण, वाळूची उपलब्धता, आधार जोडणी, जागेची उपलब्धता करून देणे, घरकुल पूर्ण झालेलया लाभार्थ्यांना पूर्ण रक्कम देणे. असा विविध बाबी यामध्ये महत्वपूर्ण आहे. सोलापूर जिल्हा परिषद सर्व घटकामध्ये राज्यात अग्रक्रमावर असताना आपण मागे रहायचे नाही.”
  प्रत्येक तालुक्यांत घरकुल मार्ट – संतोष धोत्रे 
  प्रत्येक तालुक्यात बचतगटाच्या माध्यमातून घरकुल मार्च तयार करण्यात येत आहे. या साठी गटविकास अधिकारी यांनी पुढाकार घ्यावा.  सीईओ  दिलीप स्वामी यांचे मार्गदर्शनाखाली विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहेत. पंचायतराज समितीने देखील या उपक्रमाची दखल घेतली आहे. महाआवास अभियानात देखील “घरकुल मार्ट” करून नवीन संकल्पना साकारू या,  असे आवाहन अतिरिक्त  सीईओ  संतोष धोत्रे यांनी केले.