लातूर जिल्हा परिषदेत गैरवर्तन; सोलापूरचे समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर निलंबित

लातूर जिल्हा परिषदेत गैरवर्तनाचा ठपका ठेवत सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले. निलंबनाचे आदेश पुणे विभागीय समाज कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी मंगळवारी काढले आहेत.

  सोलापूर : लातूर जिल्हा परिषदेत गैरवर्तनाचा ठपका ठेवत सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले. निलंबनाचे आदेश पुणे विभागीय समाज कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी मंगळवारी काढले आहेत. या घटनेने सोलापूर जिल्हा परिषद अधिकारी वर्तुळात खळबळ उडाली.

  जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी या पदावर लातूर जिल्हा परिषद कार्यरत असताना खमितकर यांच्या प्रशासकीय कामकाजातील विविध त्रुटीच्या अनुषंगाने तसेच वारंवार चुकीचे काम करण्याची सवय व शासकीय अधिकाऱ्यांना अशोभनीय वर्तन असल्यामुळे त्यांची सेवा समाप्ती करण्याबाबत शासनास प्रस्तावित करण्यात असल्याचे आदेशात बकोरिया यांनी स्पष्ट केले.

  लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रास्तावित केल्यानुसार खमितकर हे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत नाहीत, आढावा बैठकीस वारंवार विनापरवानगी अनुपस्थित राहणे, सन्माननीय सदस्यांच्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात न घेणे तसेच त्यांचे काम असमाधानकारक असणे, याबाबत मसुदा शासनास सादर करण्यात आला होता. तसेच खमितकर यांच्या कामकाजात अनुषंगाने विविध सामाजिक संघटना व लोकप्रतिनिधी यांच्याकडून विविध तक्रारी प्राप्त झाल्याचे निलंबन आदेशात नमूद करण्यात आले.

  सोलापूर जिल्हा परिषद येथे जिल्हा समाज कल्याण अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांच्याविषयी प्राप्ती तक्रारीनुसार तपासणी समिती नेमणूक समाज कल्याण विभागाची सर्व कार्यसनाची दप्तर तपासणी करण्यात आली. सदर अहवालानुसार  खमितकर यांनी कार्यालयीन कामकाज करत असताना गैरशिस्तीचे वर्तन करणे, प्राप्त अनुदान वेळेत खर्च न करणे तसेच योजना राबविण्याकरिता योग्य उपायोजना न करणे, कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी पूर्ण न करणे इत्यादी गैरशिस्तीचे वर्तन वर्तनाचा ठपका खमितकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांचे निलंबन करून त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याबाबत शिफारस करण्यात आली आहे. निलंबन कालावधीत खमितकर यांना प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग पुणे येथे मुख्यालय देण्यात आले आहे.

  सोलापूर जिल्हा परिषदेचा चौकशीचा प्रस्ताव

  जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील कविता यांच्याविरोधात सीईओ मनीषा आव्हाळे यांच्याकडे विविध तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तक्रारीच्या अनुषंगाने सुनील खामकर यांच्या विरोधात चौकशीचा प्रस्तावित आहे.

  समाजकल्याण अधिकारीचा पदभार कोणाकडे

  सुनील खमितकर यांच्या निलंबनानंतर जिल्हा समाज कल्याण अधिकारी चा पदभार कोणाला देणार याबाबत जिल्हा परिषद वर्तुळात चर्चा जोर धरत आहे.