
झेडपी ग्रामपंचायात विभागातील ज्येष्ठ सेवानिवृत्त कर्मचारी बुधवारी सुखावले आहेत. ऑगस्ट 2023 सालात सेवानिवृत्त झालेल्या 7 कर्मचाऱ्यांना पेन्शन अदालतीमधून न्याय मिळाला आहे.
सोलापूर : झेडपी ग्रामपंचायात विभागातील ज्येष्ठ सेवानिवृत्त कर्मचारी सुखावले आहेत. ऑगस्ट 2023 सालात सेवानिवृत्त झालेल्या 7 कर्मचाऱ्यांना पेन्शन अदालतीमधून न्याय मिळाला आहे. सीईओ मनिषा आव्हाळे (Manisha Awhale) यांच्या मार्गदर्शन आणि पाठपुराव्यामुळे ग्रामपंचायत विभागातील ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पं)/(सा) वर्गातील 7 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचा आदेश सीईओ आव्हाळे यांच्या हस्ते देण्यात आला.
ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी संवर्गातील कर्मचारी यांचे ना देय, ना चौकशी दाखले, न्यायालयीन प्रकरणे, लेखा परीक्षण, विभागीय चौकशी, अनाधिकृत गैरहजर इत्यादी कारणांमुळे त्यांना सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचे सेवानिवृत्त वेतन मंजूर होण्यास विलंब होण्याची शक्यता असते.
सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची अडचणी दूर करण्यासाठी सीईओ आव्हाळे, ग्रामपंचायात विभागाचे डेप्युटी सीईओ ईशाधीन शेळकंदे यांनी पेन्शन प्रकरणांबाबत आयोजित केलेल्या पेन्शन अदालत, वेळोवेळी घेण्यात आलेल्या पेन्शन आढावा बैठक, सुनावणी यांमुळे प्रलंबित पेन्शन प्रकरणे मंजुर होण्यासाठी गती आलेली आहे.
सध्या जिल्हा परिषद अंतर्गत सेवा पंधरवडा कार्यक्रम सुरु असुन याबाबत मनिषा आव्हाळे, यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे व वारंवार येत असलेल्या आढावा बैठकीमुळे प्रलंबित सेवा विषयक बाबीचा निपटारा होत आहे.
आगामी 6 महिन्यांत जे कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. अशा कर्मचाऱ्यांचे ना देय, ना चौकशी दाखले, न्यायालयीन प्रकरणे, लेखा परीक्षण, विभागीय चौकशी, अनाधिकृत गैरहजर, प्रकरणांबाबत पुढील 10 दिवसांमध्ये पेन्शन अदालत कर्मचाऱ्यांचे परिपूर्ण सेवानिवृत्तीचे प्रस्ताव तात्काळ झेडपीकडे सादर करण्याचे सर्व गट विकास अधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत.