काहींना शाल घेऊन फिरल्यानंतर बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं, शिवसेना ठाकरे गटाकडून राज ठाकरेंवर निशाणा

राज्यभरात काल सगळीकडे गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला अनेक नेते, मनसैनिक उपस्थित होते.

    राज्यभरात काल सगळीकडे गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला अनेक नेते, मनसैनिक उपस्थित होते.राज ठाकरे महायुती आणि मोदींना बिनशर्त पाठिंबा देणार आहेत. तसेच राज ठाकरेंनी काल आपल्या भाषणात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी एक जुन्या भाषणातील व्हिडीओ पोस्ट करत शिवसेना ठाकरे गटाने राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुती आणि मोदींना बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. मुन्नाभाईसारखी एक केस आपल्याकडे आहे, ज्याला स्वत:ला बाळासाहेब झालं असं वाटतं. हल्ली शाल घेऊन फिरतात, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

    काहींना मुन्नाभाई झाल्यासारखं वाटतंय

    उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले होते, मला शिवसैनिकाने विचारलं, तुम्ही लगे रहो मुन्नाभाई पाहिला का? त्याच्यात नाही का गांधीजी दिसतात, गांधीजी बोलतात, मग तो गांधीगिरी करायला लागतो. तशी एक केस आपल्याकडे आहे. ज्याला स्वतःला बाळासाहेब झाल्या सारखं वाटतं. हल्ली शाल घेऊन फिरतात, कधी मराठीच्या नादाला लागतात, तर कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात. चित्रपटामधला मुन्नाभाई किमान लोकांची मदत तरी करत होता. त्यातलं एक गोष्ट लक्षात घ्या, शेवटी त्या मुन्नाभाईला कळत ही, आपल्या डोक्यात केमिकल लोचा झाला आहे. तर ही केमिकल लोचाची केस आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे. असे मुन्नाभाई फिरत आहेत, तर फिरू द्या, असे उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले होते.

    शिवसेना ठाकरे गटाने साधला राज ठाकरेंवर निशाणा

    शिवसेना ठाकरे गटाने राज ठाकरेंवर निशाणा साधण्यासाठी सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात त्यांनी लिहिलं आहे, आम्हाला हुजुरेगिरी मान्य नाही, आमच्या मातीचा महाराष्ट्राच्या मातीचा आम्हाला प्राणपणा जपायचा आहे. हा स्वाभिमान जपण्यासाठी सदैव धगधगत राहणार ठाकरेंची मशाल !, असे लिहीत उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

    सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र हा लेच्या-पेच्यांचा नाही, महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मर्दांचा प्रदेश आहे. आपल्याया आपल्या महाराष्ट्राची ओळख तिच ठेवायची आहे, कणखर देशा, राकट देशा, दगडांच्या देशा. आता जे चाललंय ते, गुंडांच्या, लाचारांच्या, नामर्दांच्या देशा, अशी महाराष्ट्राची ओळख नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.