संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

आगामी काळात पाणी टंचाई निर्माण होऊ शकते, असं बोललं जातंय. दरम्यान, राज्यात आजपासून पुढील तीन दिवस मुसळधार शक्यता हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तविली आहे. तर काही भागात ऑरेन्ज व यलो अलर्ट देखील देण्यात आला आहे.

    मुंबई : जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली. ऑगस्ट महिन्यात राज्यात (State) पावसाने (Rain) विश्रांती घेतली. पावसाने दडी मारल्यामुळं शेतकरी अडचणीत आले आहेत. तर पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. मात्र सप्टेबरच्या सुरुवातीला थोडाफार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, मात्र जरी पाऊस पडला असला तरी देखील महाराष्ट्रातील काही भागात अजूनही कोरडाच आहे. या ठिकाणी पाणीसाठी खूप कमी प्रमाणात शिल्लक आहे. त्यामुळं पाऊस न पडल्यास आगामी काळात पाणी टंचाई निर्माण होऊ शकते, असं बोललं जातंय. दरम्यान, राज्यात आजपासून पुढील तीन दिवस मुसळधार शक्यता हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तविली आहे. तर काही भागात ऑरेन्ज व यलो अलर्ट देखील देण्यात आला आहे. (Some parts of Maharashtra remain dry even after rain, what percentage of water reserves in the state? What is the status of crops)

    राज्यातील काही भागात पाणी टंचाई?

    दरम्यान, जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र त्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली. त्यामुळं राज्यातील अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे, तर शेतकरी अडचणीत आले आहेत. सप्टेंबर महिना संपत आला तरी, समाधानकारण पाऊस पडला नाहीय. त्यामुळं राज्यात पावसाची तूट कायम आहे.  पुणे विभागात 65.7 टक्केच पाऊस झाला आहे. राज्यात अजूनही ९ टक्के पाऊस कमी झाला आहे. मध्य महाराष्ट्रात २० टक्के, तर मराठवाड्यात २४ टक्के पावसाची तूट आहे. यामुळे आता अजून दमदार पावसाची अपेक्षा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात असणार आहे. तर काही ठिकाणी यलो व ऑरेन्ट अलर्ट देण्यात आला आहे.

    कुठे पडणार पाऊस?

    दरम्यान, बंगालच्या उपसागरात चक्रवात निर्माण झाल्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार होणे अपेक्षित आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार आजपासून पुढील तीन दिवस हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्यात पाऊस होईल. २२ आणि २३ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट होईल. वाऱ्याचा वेग अधिक राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच येत्या २२ ते २४ सप्टेंबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    आत्तापर्यंत किती पाऊस आणि पेरणी?

    मराठवाड्यात सोयाबीननंतर कापूस, तूर, मका आणि बाजरीचे त्या खालोखाल क्षेत्र आहे. पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे. विभागात ४८ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात सर्वाधिक सोयाबीनचे ५३.२ टक्के क्षेत्र आहे. यावर्षी विभागात जून ते सप्टेंबरचे सरासरी पर्जन्यमान ६१३ मिलिमीटर आहे. मात्र, आतापर्यंत ४६४ मिमी पाऊस झाला आहे. नांदेड, लातूर आणि हिंगोली जिल्हे वगळता इतर पाच जिल्ह्यात भीषण परिस्थिती आहे. मागील आठवड्यात तीन दिवस पावसाने हजेरी लावल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

    आज यलो व ऑरेन्ज अलर्ट कुठे?

    दुसरीकडे राज्यात तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळं राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, पुणेे तसेच घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यातील सोलापूर, नंदुरबार, सांगली जिल्हा वगळता इतर सर्व ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट आहे. यामुळे शुक्रवारी राज्यभरात दमदार पाऊस असणार आहे. गोंदिया आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. याठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भातील इतर सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.