राज्याच्या राजकारणात नवीन काही तरी घडणार; रावसाहेब दानवे यांच वक्तव्य

राज्यातील राजकारणात नवीन काही तरी घडणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार गायब असल्याने आत्ता एकनाथ शिंदे कुठं असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच मराठवाड्यातील सहा आमदार गायब असल्याने सरकार पडणार का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

    जालना : शिवसेनेचे ज्येष्ठ आणि वजनदार नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची माहिती माहिती मिळत आहे. काल विधान परिषदेच्या मतदानानंतर एकनाथ शिंदे हे विधानभवनातून थेट गुजरातमधील सुरतला गेले असल्याची माहिती आली आहे. शिंदे 25 पेक्षा जास्त आमदारांसह सूरतमध्ये आहेत. शिंदे थेट भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आल्यानं महाविकास आघाडीचं सरकारच अडचणीत येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान आज भाजपचे नेते केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात जनतेचे नाराजी आहेच मात्र घटक पक्षांची देखील असल्याचे चित्र सर्वांसमाेर आले आहे. आगामी काळात नवीन काही तरी पहायला मिळेल असे सूताेवाच दानवेंनी केले.

    रावसाहेब दानवे नेमकं काय म्हणाले?

    राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आघाडी सरकारने जो आरोप केला की अपक्षांची मते फुटली. मात्र विधान परिषद निवडणुकीत मात्र आघाडीतील पक्षाच्या आमदारांची मत फुटली आणि आमचा पाचवा उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे या सरकार विरोधात जनता नाराजी आहे हे स्पष्ट झाले आहे. असं दानवे म्हणाले.

    तसेचं पुढे म्हणाले, राज्यातील राजकारणात नवीन काही तरी घडणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार गायब असल्याने आत्ता एकनाथ शिंदे कुठं असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच मराठवाड्यातील सहा आमदार गायब असल्याने सरकार पडणार का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.