वडिलांच्या आजारपणाला कंटाळून मुलाने केली निर्घृण हत्या, आरोपी मुलाला अटक; डोंबिवलीतील धक्कादायक घटना

महाराष्ट्रातील सांस्कृतिक नगरी डोंबिवलीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे वडिलांच्या आजारपणाला कंटाळून मुलाने त्यांच्या डोक्यात दगड फेकला आणि नंतर गळा चिरुन खून केला. हत्येनंतर आरोपी मुलाने स्वत: पोलीस ठाण्यात फोन करून वडिलांची हत्या केल्याची माहिती दिली.

महाराष्ट्रातील सांस्कृतिक नगरी डोंबिवलीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे वडिलांच्या आजारपणाला कंटाळून मुलाने त्यांच्या डोक्यात दगड फेकला आणि नंतर गळा चिरुन खून केला. हत्येनंतर आरोपी मुलाने स्वत: पोलीस ठाण्यात फोन करून वडिलांची हत्या केल्याची माहिती दिली. तेजस श्यामसुंदर शिंदे (21) असे आरोपी मुलाचे नाव असून श्यामसुंदर शिंदे (68) असे मृत वडिलांचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

का केला खून? 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील खंबाळपाडा येथील भोईरवाडी परिसरात श्यामसुंदर शिंदे हे पत्नी आणि मुलगा तेजससोबत राहत होते. तेजस महाविद्यालयात शिकत असून त्याचे वडील मुंबई महापालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून निवृत्त कर्मचारी होते. श्यामसुंदर शिंदे हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. आजारपणामुळे श्यामसुंदरची चिडचिड वाढली होती. यावरून तेजस आणि श्यामसुंदर यांच्यात नेहमी वाद, वादावादी होत असे.

चाकूने श्यामसुंदरचा गळा चिरला

अलीकडेच श्यामसुंदरची पत्नी काही कामानिमित्त बाहेर गेली असता, तेजस आणि श्यामसुंदर यांच्यात पुन्हा वाद झाला. वादानंतर वडील श्यामसुंदर झोपी गेले. मात्र वादावादीचा राग आल्याने तेजसने श्यामसुंदर यांच्या डोक्यात दगड घातला. श्यामसुंदरला त्रास होऊ लागला. पण त्या क्रूर मुलाला त्याची दया आली नाही तो इथेच थांबला नाही तर भाजी कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चाकूने श्यामसुंदरचा गळा चिरला. यावेळी श्यामसुंदर यांचा मृत्यू झाला.

खून केल्याची दिली कबुली

हत्येनंतर तेजसने स्वतः टिळक नगर पोलीस ठाण्यात फोन करून वडिलांची हत्या केल्याचे सांगितले. टिळकनगर पोलिसांनी तेजसला ताब्यात घेतले. तेजसने गुन्ह्याची कबुली दिल्याने पोलिसांनी तेजस शिंदेला अटक केली.