सासूचा विनयभंग केल्याप्रकरणी जावयावर गुन्हा

सातारा शहर परिसरातील विवाहिता मैत्रिणी सोबत पंचायत समिती सातारा जवळून पायी निघाल्या होत्या. यावेळी महिलेचा जावई येथे आला, त्याने अश्लिल भाषेत शिवीगाळ करून संबंधित महिलेचा हात पकडला

    सातारा :  सासूचा विनयभंग केल्याप्रकरणी जावया विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा शहर परिसरातील विवाहिता मैत्रिणी सोबत पंचायत समिती सातारा जवळून पायी निघाल्या होत्या. यावेळी महिलेचा जावई येथे आला, त्याने अश्लिल भाषेत शिवीगाळ करून संबंधित महिलेचा हात पकडला व तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार पोळ करीत आहेत.