घरगुती वादातून मुलाने केली वडिलांची हत्या; भातकुली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील भातकुली पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या सायत गावात हत्येची घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच भातकुली पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

    अमरावती : जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील भातकुली पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या सायत गावात हत्येची घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच भातकुली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा तपास केला असता एका मुलाने रागाच्या भरात वडिलांच्या डोक्यावर अवजड वस्तूने मारहाण केल्याने त्यांची हत्या झाल्याचे तपासात निष्पन्न झाले.

    याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलास ताब्यात घेतले आहे. अमरावतीजवळील भातकुली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सयत गावात ही घटना घडली. एका व्यक्तीने आपल्या बापाच्या डोक्यात बट्ट्याने वार करून त्यांची हत्या केली. रात्री घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच मंगळवारी शहर पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तेथे आपल्याच वडिलांचा खून करणाऱ्या मुलाला अटक करण्यात आली.