क्राईम सिरीयल बघुन स्वतःच्याच आई-वडीलासह भावाचा खुनाचा प्लॅन, अपघाताचा बनाव रचणाऱ्या क्रुर मुलाला अटक!

खर्चासाठी पैसै देत नसल्याने मुलाने स्वतच्याच आई वडिलासग भावाचा खुन केला आणि संशय येऊ नये म्हणून अपघाताचा बनाव केला.

  हिंगोली : आजकाल क्षुल्लक कारणावरुन भांडण होऊन लोकं रागाच्या भरात काय करणार याचा काही नेम नसतो. कधी कधी आई-वडिल भांवडांसोबतही भाडंण झाल्यानंतर आपल्याच आईवडिलांच्या जीवावर उठल्याचे प्रकार यापुर्वी घडलेले आहेत. आता अशीच एक घटना हिंगोलीमध्ये (Hingoli)  घडली आहे. आई – वडिल पैसे देत नसल्याच्या कारणावरून मुलानेच आपल्या जन्मदात्यांचा आणि सख्या भावाचा खून (Son Killed his mother Father & Brother) करत अपघाताचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना घडली आली आहे. या प्रकरणी जन्मदात्या आई वडिलांचा खून करणाऱ्या नराधमास पोलीसांनी अटक केली आहे. महेंद्र जाधव असे आरोपी मुलाचे नाव आहे.

  नेमका प्रकार काय?

  11 जानेवारीला हिंगोली येथील दिग्रस वाणी गावात लगतच्या शिवारात आई-वडिलासह मुलाचा अपघात झाल्याची घटना घडली होती. पोलिसांनी अपघाताची नोंद केली होती मात्र, काही बाबी संशयास्पद असल्याने पोलिसांनी तपास केला असता हा अपघात नसून अपघाताचा बनाव करत मुलानेच आई-वडिलांचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने त्याच्या जन्मदात्या आई वडिल आणि सख्ख्या भावाचा खुन केल्याचं उघडं झालं. आरोपी मुलगा महेंद्र जाधवने वडिल कुंडलिक जाधव, आई कलावती जाधव आणि भाऊ आकाश जाधव यांची हत्या केली.

  पैसे देत नसल्याच्या कारणावरुन मुलाचं कृत्य

  आरोपी मुलगा महेंद्र जाधव हा नेहमीच आई-वडिलांना पैसे मागत होता. पैसे न दिल्यास नेहमी त्यांच्यात वाद होत होते. घटनेच्या काही दिवसापुर्वीही त्याने आई वडिलांकडे पैशाची मागणी केली. मात्र, त्यांंनी पैसै देण्यास नकार दिल्याने तो संतापला. अनेक दिवस तो मनात राग धरुन होता. 11 जानेवारी रोजी सकाळी दिग्रस वाणी गावाच्या शिवारात दुचाकी रस्त्याच्याकडेला असलेल्या वळणात पडलेली आढळून आली. त्या ठिकाणी वडिल कुंडलिक जाधव, आई कलावती जाधव आणि मुलगा आकाश जाधव यांचा मृतदेह आढळून आला. सुरुवातीला ही घटना अपघात असून अपघातामध्ये आई-वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्याचे समोर आला होते. परंतु अपघात स्थळ बघता हा अपघात नसल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे हिंगोली पोलिसांनी अधिक तपास केला असता  मुलगा महेंद्र जाधवने हत्या केल्याचं स्पष्ट झालं.

  कशी केली हत्या

  महेंद्रचे आई वडील आणि भाऊ पैसे देत नाहीत. तसेच नातेवाईकांमध्ये पैसे मागितल्याच्या कारणावरून बदनामी करत असल्याचा राग मनात महेंद्रच्या मनात होता. महेंद्रला क्राईम सिरिअल बघण्याचं वेड होत. त्याने एका क्राईम सिरिअल मध्ये दाखवल्याप्रमाणे  स्वतःच्याच आई-वडील आणि भावाचा खून करण्याचं कट रचला यानुसार त्याने सर्वात आधी भाऊ आकाश जाधव त्यानंतर आई कलावती जाधव आणि शेवटी वडील कुंडलिक जाधव यांना मारले. त्यानंतर गावाजवळ असलेल्या रस्त्याच्या कडेला अपघाताचा बनाव करत मृतदेह त्या ठिकाणी मृतदेह टाकला. पोलीस तपासात उघड माहिती झाल्यावर आरोपी महेंद्र जाधवच्या विरोधात स्वतःच्या भाऊ आणि आई-वडिलांचा खून केल्याप्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.