पोलिसाने हफ्ता म्हणून ‘फोन पे’वरुनच घेतले 25 हजार; मग आला गोत्यात, पोलीस अधीक्षकांनी थेट…

पैठण डीवायएसपी पथकात असलेल्या या कर्मचाऱ्याने गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात अक्षरशः धुमाकूळ घातला असल्याची चर्चा होती. आपण डीवायएसपी पथकात असून, कारवाईची भीती दाखवत हा पोलीस कर्मचारी अनेकांकडून पैसे वसूल करत असल्याची चर्चा पोलीस दलात आहे.

    संभाजीनगर : पैठण डीवायएसपी पथकात असलेल्या या कर्मचाऱ्याने गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात अक्षरशः धुमाकूळ घातला असल्याची चर्चा होती. आपण डीवायएसपी पथकात असून, कारवाईची भीती दाखवत हा पोलीस कर्मचारी अनेकांकडून पैसे वसूल करत असल्याची चर्चा पोलीस दलात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्याने गुटख्याचा हफ्ता म्हणून ‘फोन पे’वरुन (Phone Pay) 25 हजार रुपये घेतल्याची माहिती पोलीस अधीक्षकांना मिळाली होती. त्यानंतर चौकशी करुन त्याच्यावर निलंबनाची कारवाई पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी केली.

    सचिन भूमे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन भूमे हा पैठण येथील डीवायएसप पथकात कार्यरत होता. दरम्यान, यापूर्वीच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा लाडका असलेला भूमे ह तालुक्यातील सर्वच पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यावाल्यांच्या संपर्कात असायचा. तसेच आपण डीवायएसपी पथकात असून, कारवाईची भीती दाखवत हा पोलीस कर्मचारी अनेकांकडून पैसे वसूल करत होता.

    दरम्यान, काही दिवसांपूर्वी देखील त्याने पाचोड पोलीस ठाणे हद्दीतील एका गुटखा माफियाला कारवाईची धमकी देत त्याच्याकडे पैशांची मागणी केली. शेवटी 25 हजार रुपयांवर तोडपाणी झाली. पण हेच त्याच्या निलंबनाची कारण ठरली.