Spart car in Konkan Railway convoy; The car also runs on the road along the railway tracks

कोकण रेल्वेच्या ताफ्यात रुळावरून चालून रेल्वे ट्रॅक चेक करणारी स्पर्ट कार दाखल झाली आहे .रस्त्यावर जशा कार चालतात तशीच ही स्पर्ट कार रेल्वे रुळावरून चालते(Spart car in Konkan Railway convoy The car also runs on the road along the railway tracks).

    सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेच्या ताफ्यात रुळावरून चालून रेल्वे ट्रॅक चेक करणारी स्पर्ट कार दाखल झाली आहे .रस्त्यावर जशा कार चालतात तशीच ही स्पर्ट कार रेल्वे रुळावरून चालते(Spart car in Konkan Railway convoy The car also runs on the road along the railway tracks).

    ऑस्ट्रेलियात बनलेली ही कार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून कोकण रेल्वेच्या सेवेत रुजू झाली आहे. रेल्वेच्या रुळातील फॉल्ट चेक करण्यासाठी कोकण रेल्वेत या कारचा उपयोग केला जात आहे. सध्या ही कार कोकणातील कणकवलीत दाखल झाली आहे.

    रोहा पासून कणकवली पर्यंतचा रेल्वे ट्रॅक या कारद्वारे चेक केला जात आहे. ही कार दररोज 40 ते 50 किमीचा रेल्वे ट्रॅक चेक करते. त्यामुळे रेल्वे ट्रॅकची दुरुस्ती लवकर करणे शक्य झाले आहे.  या कारचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही कार रेल्वे ट्रॅक बरोबरच रस्त्यावरही चालते. भारतीय रेल्वेच्या ताफ्यात या कारचे पूर्वीच आगमन झाले होते. मात्र कोकण रेल्वेच्या सेवेत ही कार एप्रिल पासून दाखल झाली आहे.