पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज पुन्हा विशेष ब्लॉक; काय आहे कारण?

जे प्रवाशी आज मुंबई-पुणे असा प्रवास करणार असतील त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. आयटीएमएस प्रणालीच्या कामासाठी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज पुन्हा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे.

    पुणे : जे प्रवाशी आज मुंबई-पुणे असा प्रवास करणार असतील त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. आयटीएमएस प्रणालीच्या कामासाठी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज पुन्हा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर दुपार १२ ते १ या वेळेत हा ब्लॉक घेतला जाणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

    तब्बल १ तासांसाठी विशेष ब्लॉक

    पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अमृतांजन पुलाच्या अलीकडे अन् पलीकडे ओव्हरहेड गॅन्ट्री बसवली जाणार आहे. त्यामुळे पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक तब्बल १ तासांसाठी बंद असणार आहे. गॅन्ट्री बसविताना मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारची वाहतूक उर्से टोल नाका येथे तसेच शोल्डर लेन वर पूर्णपणे थांबविण्यात येणार आहे.

    फक्त चारचाकी वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देण्यात आला असून लोणावळा एक्झिटवरुन खोपोली शहरातून पर्यायी रस्ता असणार आहे.